माशाची चव चाखत होता मगर तितक्यात चित्त्याने केला जोरदार हल्ला; अक्षरशः फरफटत नेलं अन् शिकारीचा थरारक Video Viral
जंगलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यातून फार वेगळे आहे. इथे कधी कोणाचा जीव जाईल त्याची शाश्वती नाही. जंगलात बलाढ्य आणि ताकदवान प्राणी कमकुवत प्राण्यांवर हल्ला करतात आणि त्यांना आपली शिकार बनतात. जंगलाचा राजा सिंह असला तरी इथे अनेक बलाढ्य शिकारी आहेत जे आपल्या ताकदीने भल्याभल्यांची शिकार करतात. यातीलच जंगलातील दोन लोकप्रिय शिकारी म्हणजे मगर आणि चित्ता. आपल्या वेगाने चित्ता कोणत्याही प्राण्याची क्षणार्धात शिकार करू शकतो तर मगर पाण्यात आपले दहशत मांडून बसलेली असते. तिला पाण्याचा राक्षस अशीही उपमा देण्यात आली आहे. अशातच आता या पाण्याच्या राक्षसाचा आणि जंगलातील वेगवान शिकाऱ्याच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात चित्ताने मगरीची शिकार केल्याचे दिसून आले. शिकाऱ्याचीच दुसऱ्या शिकाऱ्याकडून झालेली ही शिकार आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जंगलचा नियम आहे, इथे तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते आणि मगरीसोबतही असेच काहीसे घडून आल्याचे व्हिडिओत दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक मगर नदीकिनारी शिकार केलेल्या माशाचा आस्वाद घेण्यात मग्न दिसून येते आणि याच संधीचा फायदा घेत चित्ता वाऱ्याच्या वेगाने नदीत उडी मारतो आणि मगरीला आपल्या जबड्यात पकडून जंगलात घेऊन जातो. मगरीला काही समजेल त्याआधीच तो तिला फरफटत जंगलात नेतो आणि तिथेच तिचा फडशा पाडतो. काही सेकंदाची ही शिकार आता अनेकांचे लक्ष वेधून घेत असून आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे यातून दिसून येते. शिकरीचे हे दृश्य अन्नसाखळीचे प्रतिनिधित्व करते.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने, मगरीला त्याचे शेवटचे जेवण देखील पूर्ण करू दिले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि यालाच आपण जीवनाचे वर्तुळ म्हणतो ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निसर्ग अथक आहे, संकोचाला जागा नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.