Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईईsss हा काय प्रकार! रिलसाठी महिलेने जळती चूल डोक्यावर ठेवली अन् त्यावर भाजली चपाती; अजब गजब प्रकारचा Video Viral

Shocking Stunt Video : रिलसाठी आयुष्य लावलं पणाला... ! महिलेच्या पराक्रमाने सध्या सोशल मिडियावर सर्वांनाच हादरवलं असून यात तिने जळती चूल डोक्यावर ठेवल्याचे दिसून आले. एवढंच काय तर याच चूलीवर मुलगी चपात्याही भाजताना दिसली

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 01:00 PM
बाईईsss हा काय प्रकार! रिलसाठी महिलेने जळती चूल डोक्यावर ठेवली अन् त्यावर भाजली चपाती; अजब गजब प्रकारचा Video Viral

बाईईsss हा काय प्रकार! रिलसाठी महिलेने जळती चूल डोक्यावर ठेवली अन् त्यावर भाजली चपाती; अजब गजब प्रकारचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी धोकादायक कृत्यांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे.
  • एका व्हिडिओमुळे यूजर्समध्ये आश्चर्य आणि चिंता दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.
  • या घटनेवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया देत अशा प्रकारांवर टीका केली आहे.
स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक आता वाटेल ते करु लागले आहेत. धक्कादायक स्टंट्स, डान्स किंवा जुगाडांनी भरलेले अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मिडियावर आजवर अनेकदा पाहिले असतीलच. अशातच आता इंटरनेटवर महिलेचा जीवघेणा प्रकार शेअर करण्यात आला आहे ज्यात व्हायरल होण्यासाठी तिने धोकादायक पर्याय निवडल्याचे दिसून आले. डोक्यावर मडकी, गॅस घेऊन महिलांना नाचताना तुम्ही सोशल मिडियावर पाहिले असेल पण यावेळी मात्र महिलेने हद्दच पार केली. तिने कोणती वस्तू नाही तर चक्क जळती चूलच डोक्यावर ठेवली. महिलेचा हा प्रकार पाहून यूजर्स थबकले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला या प्रकरणात पुढे काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

जुन्या काळात जेवण हे चूलीवर बनवले जात होते. आजही गावाकडे गॅसऐवजी अधिकतर चूलीवरच जेवण शिजवले जाते. अशात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ देखील एका गावाकडचा असून यात महिलेने जमिनीवर नाही तर डोक्यावर चूल पेटवल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात महिलेच्या डोक्यावर जळती चूल असून त्यावर तवा देखील ठेवलेला असतो. यात स्पष्ट पाहिल्यास समजते की, एक लहान मुलगी या चूलीवर चपाती भाजत आहे.

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर भितीची एक रेषही दिसून येत नाही. ती डोक्यावर जळती चूल ठेवून गवत गोळा करण्यात मग्न असते. यूजर्सने मात्र व्हिडिओ व्हायरल होताच यावर टिका व्यक्त केली आहे. व्हायरल होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते पण यासाठी असा धोकादायक मार्ग निवडणे फार चुकीचे आहे. आपण आपल्या कला प्रदर्शनानेही लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकता. गरजेचं नाही की व्हायरल होण्यासाठी फक्त आपला जीवच दावणीला लावायला हवा.

हा व्हायरल व्हिडिओ @rabinadevi55 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये महिलेच्या प्रतापावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “पण हे करण्यामागचं नक्की कारण काय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चूल जरा जरी हलली तर महिलेचा खेळ खल्लास होईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा लोकांनी पोलिसांनी कोठडीत टाकायला हवं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dangerous stunt video woman placed burning stove on head viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Stunt video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.