
panvel-taloja-road-accident-traffic-police-saves-three-lives
तळोजा परिसरातील क्राउन कंपनी चौकात डंपर आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. धडकेनंतर रिक्षा पलटी होण्याच्या स्थितीत असताना वाहतूक पोलीस शिपाई जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत रिक्षाला आधार दिला. त्यांच्या तत्परतेमुळे रिक्षातील दोन महिला प्रवासी आणि चालक अशा तिघांचे प्राण वाचले.
पलटी होणाऱ्या रिक्षाला वाहतूक पोलिसांनी अडवले
मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा येथील क्राउन कंपनी चौकातून रिक्षा जात असताना डंपरने तिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका बाजूला कलंडून पलटी होण्याच्या स्थितीत आली. रिक्षामध्ये तीन जण प्रवास करत असल्याने काही क्षणांतच मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
डांबरी लेअरअभावी रस्ता बनला मृत्यूचा सापळा; मखमलाबाद शिव ते यशवंतनगर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच
याच वेळी चौकात वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलीस शिपाई जाधव यांच्या ही बाब लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने रिक्षेकडे धाव घेतली. रिक्षा पूर्णपणे पलटी होण्यापूर्वी त्यांनी तिला हाताने आधार देत सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रिक्षेतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दोन महिला आणि चालक हे थोडक्यात बचावले
या घटनेत रिक्षातील दोन महिला आणि चालक अशा तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अपघातानंतर अवघ्या काही क्षणांत जाधव यांनी घेतलेला निर्णय आणि दाखवलेली धाडसी कृती यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
ℕ𝔸𝕍𝕀 𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | Taloja Traffic Police and MSF Personnel Avert Major Accident at Crown Company Chowk | A major accident was averted at Crown Company Chowk in Taloja after a dumper truck collided with an auto-rickshaw carrying two women passengers and its driver. Traffic Constable Ashish Jadhav immediately rushed to the spot and physically held the auto-rickshaw upright. Traffic Constable Darade and MSF jawan Ganesh Shinde also joined the rescue effort, helping stabilise the vehicle. All three occupants were safely evacuated without injuries. The driver and passengers reportedly declined to lodge a police complaint after reaching a settlement with the dumper driver.
The CCTV footage of the timely rescue has gone viral on social media, drawing appreciation for the prompt response and presence of mind of the personnel. @Navimumpolice — ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 22, 2026
डिमिलिटेशनसाठी खासदारांना 150 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळ यांचा पलटवार
अपघाताच्या प्रसंगी मदत पोहोचेपर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी परिस्थितीचे भान ठेवून तातडीने केलेली कृती किती निर्णायक ठरू शकते, याचे उदाहरण तळोजा येथील या घटनेतून समोर आले आहे. पोलीस शिपाई जाधव यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.