Delhi Metro Viral video two young guys fight video goes viral
दिल्ली मेट्रोत सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे मेट्रोतील व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. कधी कपल्सचे व्हिडीओ तर कधी लोकांच्या भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धावत्या मेट्रोमध्ये दोन तरुणांनी प्रचंड राडा घातला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणांची मेट्रोत हाणामारी सुरु असून दोघांनी अक्षरश: एकमेकांचे कपडे फाडले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. पण असे नेमके काय घडले हे आपण जाणून घेऊयात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका तरुणाने शर्ट घातलेला नसून तो जोरा जोरा ओरडत आहे. तो समोर असललेल्या तरुणाशी वाद घालत आहे. “कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट” असे ओरडत आहे. दुसऱ्या तरुणाचा शर्ट देखील फाटलेला दिसत आहे. दोन्ही तरुण शाब्दिक वाद घालत असतात. शर्ट न घातलेला तरुण दुसऱ्या तरुणाच्या अंगावर धावून जातो. याच वेळी मेट्रोतील प्रवासी त्याला थांबवण्याचा आणी वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही शर्ट न घातलेला तरुण ऐकत नाही, “कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट” असे सतत ओरडत राहतो. हा व्हिडिओ इथेच संपला असून प्रवाशांमधील एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला आहे. पुढे नेमकं काय घडले हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
“कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट”
दिल्ली मेट्रो एक बार फिर सुर्खियों में।
दो यात्रियों ने एक दूसरे के कपड़े फाड़े और चलती मेट्रो में हाथापाई की। pic.twitter.com/xGyQXqiAfd
— Rishi Choudhary 🇮🇳 (@RishiRahar) April 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RishiRahar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मेट्रोत प्रसाशनाने अशा छपरी लोकांना जाऊच दिले नाही पाहिजे, तर दुसऱ्या एकाने हे रोजचे आहे. आणखी एका युजरने यामुळे प्रवाशांना किती ताप होतो असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘”कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट” दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत. चालत्या मेट्रोमध्ये दोन प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि हाणामारी केली. असे लिहिले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.