
Desi Jugaad
नेमका काय आहे जुगाड?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कुंडीत दिवा लावण्यात आला आहे. आता दिवा म्हणलं की तेलं लागत. पण अनेकदा तेल संपले आणि आपले लक्ष नसले तर दिवा विझतो. पण एका पठ्ठ्यानं असा जुगाडा केला आहे की, दिवा चार-पास तास काही विझणार नाही. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, एका बाटलीत तेल भरण्यात आलेले आहे. ती बाटली जवळच्या झाडाला उलटी लटकवण्यात आली आहे. बाटलीच्या झाकणाला होल पाडण्यात आले असून त्यामध्ये सलाइनची वायर लावण्यात आली आहे. आणि ही सलाइनची वायर,(पाइप) कुंडीमधील दिव्यात सोडण्यात आली आहे. या पाइपमधून तेल थेंब थेंब दिव्यात पडत आहे. यामुळे दिवा लवकर विझणार नाही.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा जुगाड पाहणाऱ्यांचे डोकं चक्रावून गेले आहे. जुगाड करणाऱ्यांच्या मते, यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि त्यांचा पैसाही वाचतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sandeepsingh46958 या अकाउंटवर शेअर करण्यता आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत जुगाड करणाऱ्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने भाऊ, अशा आयडिया सुचतात कुठून यांना असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एक वाह, काय जुगाड आहे असे म्हटले आहे. तर काहींनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.