Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटताच अरविंद केजरीवाल झाले भावुक, पत्रकारांशी बोलताना ढसाढसा रडले; Video Viral

Arvind Kejriwal Crying Video: सुमारे दोन वर्षांनंतर दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले. पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल भावुक झाले, त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 02:28 PM
दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटताच अरविंद केजरीवाल झाले भावुक, पत्रकारांशी बोलताना ढसाढसा रडले; Video Viral

दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटताच अरविंद केजरीवाल झाले भावुक, पत्रकारांशी बोलताना ढसाढसा रडले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयाने सर्व आरोप फेटाळत अरविंद केजरीवाल यांची सुटका केली.
  • माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
  • त्यांनी हा खटला “पूर्णपणे बनावट” असल्याचा दावा केला.
2024 साली अरवंद केजरीवाल यांना दारु घोटाळा प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होतं. त्यावेळी केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते आणि ते पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांना पोलिसांद्वारे अटक करण्यात आली. अशातच आता दारु घोटाळा प्रकरणातून अरविंद केजरीवालांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून याचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांना अचानक अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडू लागले.

Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल ‘Punch The Monkey’ सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री झाले भावुक

केजरीवाल म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून भाजप दारू घोटाळ्याबद्दल ज्या पद्धतीने बोलत होती आणि आमच्यावर आरोप करत होती, आज न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, सत्याचा विजय झाला आहे, सर्व मोठ्या नेत्यांना आपचा नाश करण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते.”

केजरीवाल पुढे म्हणाले, “हा पूर्णपणे बनावट खटला होता. केजरीवाल भ्रष्ट नाहीत. मी माझ्या आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमावला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आप हे कट्टर प्रामाणिक आहेत.” त्यांनी भाजपवर हल्ला चढवत म्हटले की, “चांगले काम करून सत्तेत येणे आणि नंतर खोटे खटले दाखल करून आम्हाला तुरुंगात टाकणे हे पंतप्रधानांना शोभत नाही.”

VIDEO | AAP national convenor Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) breaks down as he addresses media after appearing before Rouse Avenue Court over the Delhi Excise Policy case. He says, “For the past few years, the way BJP has been accusing us in the Delhi excise policy case, today… pic.twitter.com/jtREb0JyVi — Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

अरविंद केजरीवालांचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “अभिनंदन.. सत्याचा विजय झाला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “राजकारणात, खोटारडे, फसवे, जुमलाबाज, टोपीबाज आणि ढोंगी कोण आहे हे जनतेला चांगलेच माहिती आहे, फक्त एकच गोष्ट आहे की या घाणेरड्या राजकीय खेळात जनतेचा पैसा वाया जातो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ज्यांनी कट रचून जेल मध्ये पाठवले त्या कमीन्यांना आता जेल मध्ये टाका. त्या चौकशी करणाऱ्याला जेल मध्ये टाका”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral arvind kejriwal emotional after acquittal liquor scam case viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • AAP Arvind Kejriwal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
2

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.