Young man's crazy Jugad made a car out of a bed VIDEO goes viral
हल्ली सोशल मीडियावर काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड करणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी हे जुगाड असे असतात पाहून करणाऱ्याचे कौतुक केल्यासविया आपण राहत नाही. तर कधी असे जुगाड पाहायला मिळतात की रडावे की हसावे कळत नाही. जुगाड करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात. शिवाय अनेकदा असे जुगाड पाहायला मिळतात की आश्चर्याता पाडतात. सध्या एक भन्नाट अशा जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्ये एका तरुणाने भन्नाट असा जुगाड केला आहे. हा जुगाड पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. या तरुणाने एका बेडला कार बनवून टाकले आहे. तरुणाने एख चालता फिरता बेड बनवला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणाने एक कार आणि पलंग पासून एक भन्नाट असा जुगाड केला आहे. त्याने कारचे स्टेअरिंग, चाक, इंजिन सगळे बेडला बसवले आहे. त्याने बेडच्या मधी इंडिन बसवले असून ते चालवता यावे म्हणून बसण्यासाठी एक जागा देखील केली आहे. तो हा अनोखा जुगाड घेऊन भर रस्त्यातवर फिरत आहे. हा बेड अगदी गाडीसारखा वेगाने धावत आहे. असा जुगाड या तरुणाने केला आहे ज्याची कधी कल्पनाही केली नसेल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @noyabsk53 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने भाऊ, काय जुगाड आहे भारीच असे म्हटले आहे. आणखी एका युजरने हे सगळं ठीक आहे, पण रस्त्यावर वळण आले तर वळवणार कसे असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एकाने हे फक्त भारतातच पाहायला मिळते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.