मालकाची एक चुक बेतली श्वानाच्या जीवावर; धावत्या ट्रेनमध्ये चढला अन्... , Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेत अनेक अपघातांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अलीकडे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहयला मिळत आहेत. अनेदा रेल्वे प्रशासनाने सुचना देऊनही लोक पुन्हा पुन्हा तीच चुक करतात आणि आपला जीव गमावून बसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका मानवाच्या चुकीमुळे मुक्या जनावराचा बळी गेला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे प्लॅटफॉर्म दिसत आहे. तिथेच एक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यासोबत ट्रेनची वाट बघत उभी आहे. याच दरम्यान एक ट्रेन येते. ट्रेन प्लॅटफॉर्मवर नुकतीच येत असते. मात्र, ट्रेन थांबण्याआधीच आपल्या श्वानासोबत व्यक्त ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैवाने श्वानाचा पाय घसरुन तो ट्रेन खाली येतो. मालक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत श्वान ट्रेनखाली पडलेले असते. ट्रेन नुकतीच सुटली असल्याने ट्रेन थांबल्याशिवाय श्वानाला वाचवणे कठीण असते. मालकाच्या एका चुकीमुळे मुक्या प्राण्याचा जीव गेला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी दु:ख आणि संताप व्यक्त तेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Wtf
pic.twitter.com/LF6xmGSdjw— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, कुत्र्याच्या मालकाविकोधात कारवाई करण्यात यावी, तर दुसऱ्या एकाने पाळीव प्राण्यांना संभाळता येत नसेल पाळू नये असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने अशा लोकांना कितीही समजून सांगितले तरी समजत नाही, मूर्खाने मुक्या जनावराचाही जीव घेतला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.