dog and cock fight video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हायरल होत असते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी भयावह घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की, हसून पोट दुखेल, तर काही व्हिडिओ असे असतात की पाहून किळस येईल. यामध्ये प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगालाती, पाळीव प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक कुत्रा आणि कोंबड्यामध्ये दंगल रंगली असल्याचे दिसून येते.
हा व्हिडिओ मुरादाबाद येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा आणि कोंबड्यामध्ये भांडण सुरु झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोंबड्याने कुत्र्याला असे घाबरवले आहे की, त्याने तिथून पळ काढला आहे. तुम्ही पाहू शकता कुत्रा कोंबड्यावर पंजाने वार करत आहे, तर कोंबडा चोचीने वार करत आहे. कोंबडा एकामागून एक वार करत असल्याने कुत्र्याला हल्ला करायला चान्स मिळाला नाही. कुत्रा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कोंबडा सतत त्याच्यावर चोचीने हल्ला करत आहे.
सहसा पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्याला ताकदवार मानले जात, मात्र कोंबड्यापुढे कुत्र्याती ताकद कमी पडली आहे. यावरुन हेही लक्षात येते की, अनेकवेळा आपण आपल्यापेक्षा छोट्यांना कमीपणा दाखवायला जातो, घाबरवायला जातो. पण अनेदा हे छोटे आपल्यावरच भारी पडू शकतात. यामुळे कधीही कोणाला आपल्यापेक्षा कमी समजू नये. सध्या हा कुत्रा आणि कोंबड्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mohd_armaan_inc या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी फाईट बघण्यात मज्जा आली असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मनोरंजानेचे कारण ठरला आहे. हा व्हिडिओ अनेक वेळा शेअरही करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.