Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवतेला काळीमा! 13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद, Video Viral

Child Abuse : गुवाहाटीमध्ये सहा वर्षांपासून मोलकरणी म्हणून काम करणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीवर नियमितपणे बालशोषण केले जात होते. जिल्हा कामगार दलाच्या लोकांनी मुलीची सुटका केली असून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 12:45 PM
मानवतेला काळीमा! 13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद, Video Viral

मानवतेला काळीमा! 13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आसामच्या गुवाहाटीमध्ये १३ वर्षांच्या मुलीला बेकायदेशीरपणे मोलकरीण म्हणून ठेवण्यात आले होते.
  • जिल्हा कामगार कार्य दलाने छापा टाकून मुलीची सुटका केली आहे.
  • मुलगी गेल्या सहा वर्षांपासून त्या घरात काम करत होती आणि तिच्यावर नियमित अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
आसामच्या गुवाहाटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, १३ वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये मुलीला घरातील लोकांनी बेडच्या बाॅक्समध्ये लपवल्याचे दिसते, ज्यातून काही लोक तिची सुटका करत आहेत. ज्या घरात ती सापडली तिथे ती एक मोलकरीण म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात अल्पवयीन मुलीला मोलकरीण म्हणून कामावर ठेवणे बेकायदेशीर आहे. तथापि, गुवाहाटीमधील या घटनेने आता सर्वांचाच संताप अनावर केला आहे.

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

नक्की काय आहे प्रकरण?

रविवारी संध्याकाळी किशोरी नावाच्या मुलीची सुटका करण्यात आली जिला घरात मोलकरीण बनवून ठेवलं गेलं होतं. जिल्हा कामगार कार्य दलाने मुख्य तक्रारदार असलेल्या दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचाव कार्य केले. स्थानिक रहिवाशांनी प्रामुख्याने तक्रार केली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेडखाली एका बॉक्समध्ये बंद केल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकाच बेडवर आरामात झोपले होते.

ही मुलगी फक्त १३ वर्षांची आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती गुवाहाटी येथील घरात काम करत होती. यावरून असे दिसून येते की ती मुलगी खूप लहानपणापासून घरात काम करत होती. कुटुंबातील सदस्यांनी तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. जिल्हा कामगार कार्य दलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती आधीच मिळाली होती. या माहितीच्या आधारे एका पथकाने घरावर छापा टाकला.

दरम्यान घरातील लोकांना या छाप्याची माहिती मिळताच त्यांनी मुलीला लपवण्यासाठी तिला बेडच्या आत टाकले. अधिकाऱ्यांचा आरोप आहे की किशोरवयीन मुलगी पोहोचण्यापूर्वी सुमारे २५ मिनिटे तिथे लपून राहिली होती. घराच्या मालकीचे नाव अरेना लस्कर खातून असून सुरुवातीला तिने मुलगी घरात असल्याचा दावा पूर्णपणे नाकारला. तिने सांगितले की, मुलीचे वडिल तिला तिला तीन ते चार दिवसांपूर्वी घेऊन गेले होते. तथापि, जिल्हा कामगार कृती दलाच्या पथकाने तिच्यावर विश्वास ठेवला नाही.

Assam: A 13 y/o girl was rescued in Guwahati after being held captive for 6 years by Amreen Akhtar Laskar.
– Neighbours informed authorities.
– During the raid, Amreen hid her inside a bed box to evade rescue.
– The girl was forced to do household work and beaten regularly. pic.twitter.com/FAuh7ReXKc
— زماں (@Delhiite_) February 4, 2026

जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्… घटनेचा Video Viral

यानंतर जेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांनी घराची झडती घेण्याल सुरुवात केली तेव्हा त्यांना बेडच्या आत मुलीला डांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बेडच्या आत इतका वेळ डांबवून ठेवल्यामुळे मुलगी कमकुवत झाली होती. या अवस्थेत बाहेर काढताच तिला प्रथम पाणी देण्यात आले. शुद्धीवर येताच ती रडत असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ती गेल्या सहा वर्षांपासून या घरात काम करत होती आणि तिचे नियमितपणे शारीरिक शोषण होत. मुलीला वाचवण्यात आणि सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात यश आले असून आरोपींवर गंभीर कारवाई केली जाणार आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral assam guwahati 13 year old child labour girl rescued from house viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Assam
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.