डॉगेश भाई से पंगा नहीं... ! दबक्या पावलांनी आला अन् थेट जंगलाच्या राणीवरच केला हल्ला, पाहून सिंहही घाबरला; Video Viral
जंगलाचा बलाढ्य राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह आणि त्याची पत्नी जंगलाची राणी सिंहीणीची दहशत संपूर्ण जंगलभर पसरलेली असते. त्यांच्याशी पंगा घेण्याची हिम्मत कुणाच्यातच नाही पण आता मात्र सोशल मीडियावर एक अनोखा आणि तितकाच मजेदार असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका श्वानाने जंगलाच्या राजा-राणीशी जबरदस्त पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे, कुत्रा सिंहाला नाही तर सिंहच कुत्र्याची हिम्मत पाहून त्याला घाबरून पळत आहे. जंगलातील हे दृश्य अनेकांना थक्क करण्यासारखे असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एका मोकळ्या मैदानात सिंह आणि सिंहीण विहार करताना दिसून येत आहेत. सगळं काही ठीक असतं मात्र तितक्यातच तिथे एका श्वानाची एंट्री होते. यातही पुढे मजेदार घटना अशी घडते की, कुत्रा सिंह आणि सिंहिणीला पाहून घाबरत नाही तर स्वतः हिम्मत करून त्यांच्याजवळ जातो आणि डायरेक्ट सिंहिणीवर हल्ला करतो. सिंह हे सर्व दृश्य पाहून हादरतो आणि तितक्यातच तो सिंहावर हल्ला करण्यासाठी पुढ धावतो. सिंह लगोलग मागे जातो आणि एकंदरीतच एका अनोख्या दृश्याचे दर्शन घडते जे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन जाते. कुत्रा हा एक सामान्य प्राणी मानला जातो जो आपल्या प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो तर सिंह जंगलाचा एक साहसी आणि धोकादायक शिकारी मानला जातो. अशात सिंहाने विचार केला तर तो क्षणात श्वानाचे लचके तोडू शकतो पण व्हिडिओत सिंह श्वानाला नाही तर कुत्राच सिंहावर भारी पडल्याचे दिसले ज्यामुळे सर्वच कोड्यात पडले.
हा व्हायरल व्हिडिओ @antix_viral नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंहाचा श्रावण महिना सुरु आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मागची सर्व पब्लिक शॉकमध्ये आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या दिवशी त्याचा मूड चांगला होता नाहीतर डॉगेश भावाची सर्व नशा उतरून गेली असती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.