(फोटो सौजन्य: Instagram)
खाजगी क्षेत्रात नोकरी बदलणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बहुतेक लोक चांगल्या पगारासाठी किंवा काही वैयक्तिक कारणामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. आता कॉर्पोरेटचे नियम पाहता जर तुम्हाला नोकरी सोडायची असेल तर तुम्हाला त्यासाठी कंपनीला आधी राजीनामा द्यावा लागतो. या राजीनाम्यात आपण आपली माहिती आणि नोकरी सोडण्याचे कारण लिहायचे असते. त्यातच आता सोशल मीडियावर एक अनोखा राजीनामा व्हायरल होत आहे ज्यात एका कर्मचाऱ्याने आपल्या नोकरी सोडण्याचे एक मजेदार कारण सांगितले आहे. त्याचे हे कारण आता संपूर्ण सोशल मीडियावर हास्याचे एक कारण बनले आहे. आपल्या या राजीनाम्यात तरुणाने फार मजेशीर गोष्टी लिहिल्या ज्यामुळे सोशल मीडियावर हा राजीनामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चला यात काय लिहिले आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
राजीनाम्यात काय लिहिले?
सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या फार चर्चेत आहे ज्यात एका तरुणाचा राजीनामा शेअर करण्यात आला आहे. यात तरुणाने नोकरी सोडण्यासाठीचे एक मजेदार कारण दिले आहे जे आता सर्वांनाच हसवत आहे. कर्मचाऱ्याने ईमेलद्वारे राजीनामा पत्रात लिहिले, “नमस्कार सर, मी विकला गेला आहे. समोरची कंपनी मला चार पैसे जास्त देत आहे”. यातच खाली रिगार्ड्समध्ये ‘दयित्वा जयस्वाल’ हे नाव लिहिले आहे. यावरूनच राजीनामा लिहीणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव दयित्वा जयस्वाल असल्याचे स्पष्ट होते. सोशल मीडियावर हा राजीनामा आता चांगलाच व्हायरल होत असून लोक याला आतापर्यंत पाहिलेला सर्वात प्रामाणिक राजीनामा असल्याचे म्हणत आहेत.
दरम्यान हा राजीनामा @dayitva_jaiswal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दयित्वा आपले दायित्व विसरून गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतच्या सर्वोत्तम राजीनाम्यांपैकी एक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वर्षातील सर्वोत्कृष्ट कर्मचारी जैसा पैसा वैसा काम “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.