(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर तुम्हाला कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक व्हिडिओज व्हायरल होत असतात पण आता मात्र इथे एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात मानवाला लाजवणारे दृश्य दिसून आले आहे. जगभरात 8 अब्जांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या पृथ्वीवर आज मानवी प्रगतीचं जितकं कौतुक होतं, तितकंच मानवामुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाचं दु:खद वास्तवही समोर येतं. याचे एक लाजिरवाणे उदाहरण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात जंगलातील शिकाऱ्याने म्हणजे वाघाने स्वतः स्वछता अभियान हाती घेतल्याचे दिसून आले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक वाघ जंगलात फिरताना प्लास्टिकच्या कचऱ्याने त्रस्त झाल्याचं दिसतं. जंगलाच्या शांततेत माणसाने टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, प्लास्टिकच्या पिशव्या या सर्व घाणीकडे वाघाने एकटक पाहिलं. पुढच्याच क्षणी वाघाने आपल्याच तोंडाने एक प्लास्टिकची पिशवी उचलून दूर नेऊन टाकली. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनाचा भाग नाही, तर हा एक गंभीर संदेश घेऊन आला आहे की, माणसाच्या कृतीमुळे जंगलातील प्राणीही अस्वस्थ झाले आहेत. वाघासारखा बलाढ्य आणि अभिमानाचा प्राणी जर आपल्या घाणीकडे पाहून त्रासलेला आहे.
घटनेचा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, बहुतेकांनी माणसाच्या बेपर्वा वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. “आपणच जंगलं घाण करत आहोत, आणि निसर्गातले राजा आता त्याची साफसफाई करतायत” अशी टीका अनेकांनी केली. काहींनी तर याला “8 अब्ज लोकांना लाजवणारा क्षण” असंही म्हटलं आहे. र्गाने आपल्याला जे भरभरून दिलं आहे, त्याची कदर करणं, स्वच्छता राखणं आणि जंगलांना त्यांच्या नैसर्गिक स्वरूपातच जपणं ही आपली जबाबदारी आहे हा संदेश आपल्याला या व्हिडिओतून शिकायला मिळतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.