अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है! हल्ला करू पाहणाऱ्या मगरीला श्वानाने दाखवला इंगा; दातांनी फाडला जबडा अन् थरारक Video Viral
जंगलातील प्राणी आपल्या धोकादायक शिकारीसाठी ओळखले जातात. यातीलच एक प्राणी म्हणजे मगर! जसे सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते तसेच मगरीला पाण्याचा राक्षस ही उपमा दिली जाते. आपल्या थरारक आणि चपळ शिकारीमुळे मगर नेहमीच ट्रेंडमध्ये असते. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत मात्र नुकताच एक अनोखा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात मगर स्वतःच शिकार झाल्याचे दिसून आले आणि यावेळी तिची ही शिकार करणारा कोणत्या मोठा प्राणी नसून एका श्वानाने मगरीवर हल्ला केला.
आपल्या संपूर्ण ताकदीने कुत्रा मगरीवर तुटून पडतो आणि क्षणातच त्याचा जबडा फाडतो. त्याचा हा हल्ला इतका जबरदस्त असतो की तो पाहून मगरीचा थरकाप उठतो आणि ती आपला जीव वाचवण्यासाठी इतके तिकडे पळू लागते. हे सर्वच दृश्य आता एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केले आहे. व्हिडिओतील हे दृश्य लोकांना थक्क करत असून एका श्वानाच्या हातून होणारी मगरीची शिकार आता लोकांना अचंबित करत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक व्हिडिओला वेगाने शेअर देखील करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका रस्त्यावरील कुत्रा तलावाजवळ उभा असल्याचे दिसून येते. मगरीला पाहताच एक माणूस त्याला मारायला त्याच्यावर धावून येतो मात्र मगर कशीबशी त्याच्या तावडीतून सुटते. पण पुढेच एक कुत्रा उभा असतो तो तिला आपल्या तोंडाने पकडतो आणि चावून मगरीचा जबडा फाडू लागतो. व्हिडिओच्या शेवटी कुत्रा मगरीला चावत असल्याचे दिसते तर मगर वेदनेने कळवळत आपल्या सुटकेचा प्रयत्न करताना दिसून येते.
— PREDATOR VIDS (@Predatorvids) May 12, 2025
लगता है बहुत गहरा याराना है! अनेक वर्षांनी झाली भेट, गळाभेट घेतली थेट; दोन मगरींचा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Predatorvids नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून लोक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवर घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “धाडसी कुत्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भक्षक नुकताच शिकार झाला, बापरे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.