जगण्यासाठीचा संघर्ष! सापांनी भरलेल्या विहरीत तीन कुत्र्यांचा जीव टांगणीला; जीवाची भीक मागू लागले अन् मग जे घडलं... Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. इथे बऱ्याचदा काही थरारक व्हिडिओ शेअर केले जातात जे आपल्या कल्पनेपलीकडचे असतात. आताही इथे प्राण्यांचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक तीन कुत्रे विषारी सापाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. वास्तविक घडले असे की, साप आणि घोरपड असलेल्या विहिरीत अचानक तीन कुत्रे पडतात आणि इथूनच त्यांचा जगण्या-मारण्याचा संघर्ष सुरु होतो. आता यात पुढे श्वानांचे नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन कुत्रे खोल विहिरीत पडल्याचे दिसून येते. या कुत्र्यांव्यतिरिक्त, या विहिरीत एक घोरपड आणि विषारी साप बसलेला असतो. कुत्रे विहिरीत पडताच आपल्या आयुष्यासाठी सापाशी झुंज देऊ लागतात. अशा परिस्थितीत, एका सर्पमित्राने धाडस आणि माणुसकी दाखवली आणि त्या तीन कुत्र्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तीन कुत्रे एका खोल विहिरीत पडतात. या विहिरीत विषारी साप आणि घोरपड थान मांडून बसलेले असतात. कुत्रे घाबरलेले आणि अस्वस्थ झालेले दिसतात. विहिरीत सर्व प्राणी एकमेकांशी लढू लागतात, हे पाहून एक सर्पमित्र दोरीच्या साहाय्याने विहिरीत उडी मारतो आणि मोठ्या धाडसाने तो कुत्र्यांना एक एक करून पकडून बाहेर काढतो. विहिरीबाहेर उभे असलेले इतर लोक कुत्र्यांना बाहेर काढण्यात मदत करतात. त्यानंतर विहिरीतील सापाला आणि घोरपडीलाही विहिरीतून बाहेर काढले जाते. हे संपूर्णच दृश्य फार रोमांचक आणि साहसी वळण घेते जे पाहणे सर्वांसाठी रंजक ठरते. घोरपड आणि साप हे जंगलातील धोकादायक प्राणी आहेत अशात त्यांच्यात अडकताच आता काय कुत्रे वाचत नाहीत असेच सर्वांनां वाटू लागते मात्र शेवटी काहीतरी वेगळेच घडते ते सर्वांचेच होश उडवते.
व्हिडिओ व्हायरल होताच आता अनेक युजर्स सर्पमित्राचे आणि स्थानिक लोकांचे कौतुक करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @murliwalehausla24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्ही चांगले काम करता, तुम्ही सापालाही वाचवता, तुम्ही गायीची सेवा करता, ते चांगले आहे पण कुत्र्यांचीही सेवा करा, त्यांनाही त्रास होतो, कृपया त्यांचा गैरवापर करू नका”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.