मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्...; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक अपघातांचे सीसीटीव्ह फेटजही पाहायला मिळतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा हे अपघात वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्याने होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने भीषण अपघाता झाला आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूतील असल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडूच्या पेरियानायकनपलयम मध्ये ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने अनेकांना गाडीने उडवले आहे. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि त्याचे अचानक नियंत्रण सुटले. यामुळे त्याने दोन दुचाकीस्वार आणि तिथूनच जाणाऱ्या आणखी एका चारचाकीला जोरार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार हवेत उडून खाली आदळले. दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या चारचाकीला किरकोळ नुकसान झाले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा अपघाता झाल्यानंतर आसपासच्या लोकांमध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.
ना लाईफ की फिकर, ना पानी का डर…! रिलसाठी जोडप्यानं कालव्यात उडी मारली अन्…; भयावह Video Viral
व्हायरल व्हिडिओ
@Deadlykalesh pic.twitter.com/U1qdjhipHY
— . (@6ppri) August 14, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
गेल्या काही काळात वाहतूकीच्य नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक अपघातांच्या घटना देशामध्ये घडल्या आहे. या घटनेवरुन देखील पाहू शकता की, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे किती महागात पडू शकते. केवळ आपल्या जीवाला नव्हे तर दुसऱ्याच्याही जीवाला धोका निर्माण होतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली जात आहे. स्थानिक पोलिसांनी याची माहिती कळवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.