Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

तीस्ता नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या हत्तीच्या पिल्लाची अखेर त्याच्या आईसोबत पुन्हा भेट झाली. स्थानिक मच्छिमार आणि वन विभागाच्या मदतीने पिल्लाचे रेस्क्यू करण्यात आले. आईजवळ पोहोचताच पिल्लाने धावत जाऊन तिला बिलगल्याचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 03:09 PM
तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तीस्ता नदीच्या प्रवाहात वाहून गेले हत्तीचे नवजात पिल्लू
  • स्थानिक मच्छिमार आणि वन विभागाने राबवले थरारक रेस्क्यू ऑपरेशन
  • आईला पाहताच पिल्लाने धावत जाऊन मारली घट्ट मिठी, VIDEO व्हायरल
आई आणि तिच्या मुलामधील नाते हे फार खास मानले जाते. हे नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही लोकप्रिय आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई आपले प्राण पणाला लावते. पण विचार करा, मुलगा वाईट परिस्थितीत अडकलाय पण आईला काहीच करता येत नसेल तर अशा परिस्थितीत काय घडेल… अशीच काहीशी घटना अलिकडे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. माहितीनुसार, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे आपल्या आईपासून हत्तीचे एक पिल्लू वेगळे झाले. अशात वन विभागाचे पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने हत्तीच्या पिल्लाचे बचावकार्य हातात घेण्यात आले आणि त्याची आपल्या आईशी भेट करवून देण्यात आली. या संपूर्ण रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, हत्तीचे नवजात बाळ पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तीस्ता नदीत वाहून गेले होते. जोरदार प्रवाहाने त्याला सुमारे ५ किलोमीटरपर्यंत प्रवाहाच्या दिशेने वाहून नेले. इतक्या लांबपर्यंत वाहून गेल्यानंतर मुलगा अक्षरश: बुडण्याच्या स्थितीत आला होता पण या कठीण परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार आणि वन विभागाने हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धाव घेतली. नदीचा प्रवाह आणि कठीण परिस्थितीचा सामना करत, पथकाने बुडणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला सुरक्षितपणे वाचवले. एका बोटीच्या साहाय्याने सर्वांनी हत्तीच्या पिल्लाला वाचवले आणि बोटीत बसवून त्याला त्याच्या आईजवळ आणण्यात आले.

A newborn elephant calf was swept nearly 5 km downstream by Teesta’s strong currents.
Our Forest team, with help of local fishermen, rescued the drowning calf and reunited it with its mother.
A beautiful story of rescue and reunion. 🐘#elephant #wildlife #IFS #forest #teesta pic.twitter.com/rvq7fpyMd2
— Mudit Kumar Verma IFS (@MuditKVerma) September 21, 2026

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

बचावानंतर व्हिडिओत आपल्याला लहान हत्ती आपले इवलेसे पाऊल पुढे टाकत आई हत्तीणीजवळ जाताना दिसतो. घडलेल्या प्रकाराने तो इतका घाबरलेला असतो की आपल्या आईला पाहताच तो तिच्या दिशेने धाव घेतो आणि बिलगूनच तिला एक घट्ट मिठी मारतो. या घटनेचा व्हिडिओ @MuditKVerma नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या बचावावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मला तर व्हिडिओत फक्त स्थानिक दिसले, वन विभाग नव्हतेच व्हिडिओत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हत्तीच्या पिल्लाला आईने खूप ओरडा दिला असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हत्तीण आणि तिच्या पिल्लाची पुन्हा भेट घडवून आणण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि त्यांना देवाचा आशीर्वाद लाभो!”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Elephant calf rescue teesta river reunited with mother emotional viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
1

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
3

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
4

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.