(फोटो सौजन्य: X)
‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओतील घटना नेमकी कुठे घडून आली याची अधिकृत माहिती पुरवण्यात आलेली नाही पण यातील दृष्ये मात्र सर्वांना हादरवून टाकणारी आहेत. यात आपण पाहिलं तर आपल्याला सुरुवातीलाच विजेच्या तारांवर एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना दिसतो. व्यक्तीला खरंतर खाली जमिनीवर उतरायचे असते पण पुढे विजेच्या तारांचा खच पसरलेला असल्याने इथेच त्याचा घात होतो. विजेचा खांब पाहून व्यक्ती लगेच जमिनीवर लँडिगची तयारी करतो पण असं करत असतानाच त्याचा स्पर्श विजेच्या तारेला होतो आणि एका मोठ्या ब्लास्टसह तो जमिनीच्या दिशेने कोसळू लागतो. मुख्य म्हणजे व्यक्ती एकदाच नाही तर अनेकदा विजेच्या तारांवर जाऊन आदळतो ज्यामुळे त्याची वाचण्याची शक्यता फार कमी वर्तवली जाते. सध्या त्याची परिस्थीती काय आहे, या अपघातातून तो जिवंत वाचला की नाही याविषयीची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
One of the biggest incident..
A man with the parachute is about to touch the land, but unfortunately it touches the High voltage electric current wire.. pic.twitter.com/8ckFVdm7bt — ER. Team Leader (@alfuratyalatiqe) September 20, 2026
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @alfuratyalatiqe नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून आतापार्यंत ३५.४ हजार व्ह्यूज व्हिडिओला आतापार्यंत मिळाले आहेत. अनेकांनी घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने म्हटले की, “हा व्हिडिओ एआय (AI) निर्मिती आहे की वास्तव, हे ओळखणे कठीण आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विजेच्या तारांजवळ पॅराग्लायडिंग कधीच केली जात नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला असं वाटतं की हे खरं नसून एआय निर्मित आहे”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






