Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास… मुलगी म्हणाली ‘अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा’

Emotional Video : जिवंतपणी एका भेटीची आस आणि मृत्यूनंतर एका खांद्याची अपेक्षा... पण दोन्ही इच्छा अपुऱ्याच राहिल्या. वृद्धाश्रमात वडिलांच्या मृत्यूनंतर तीन मुलींपैकी एकीनेही अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही, उलट अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा अशी मागणी त्यांनी केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 02:06 PM
शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास... मुलगी म्हणाली 'अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा'

शेवटचा निरोपही मिळाला नाही; लेकींच्या प्रतीक्षेतच वडिलांनी सोडला अखेरचा श्वास... मुलगी म्हणाली 'अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवा'

Follow Us
Follow Us:
  • वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७४ वर्षीय व्यक्तींच्या अंत्यसंस्काराला तीनपैकी एकही मुलगी उपस्थित राहिली नाही.
  • मुलींनी प्रत्यक्ष येण्याऐवजी व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार पाहण्याची विनंती केल्याने घटना चर्चेत आली.
  • अंत्यसंस्कारानंतर अस्थी स्वीकारण्यासही नकार देत त्या गंगेत विसर्जित करण्याची जबाबदारी वृद्धाश्रम कर्मचाऱ्यांवर सोपवली.
ज्या वडिलांनी लहानपणापासून मुलींचे संगोपन केले, त्यांना शिकवलं, मोठ केलं त्याच मुलींना वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याय वेळ नाही. ही घटना ऐकताच अनेकांना धक्का बसेल पण वास्तवात असे घडून आले आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. माहितीनुसार, हरियाणातील सेनीपतमधून ही घटना समोर आली आहे. येथील एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांना तीन मुली आहेत. ज्या मुलींना लहाणाचे मोठे केले त्या मुलींपैकी एकही मुलगी शिवचरण यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली नाही. त्यांचे अंतिम संस्कार वृद्धाश्रमातील स्टाफ आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पार पडला. यावेळी मुलींनी फक्त व्हिडिओ काॅलवर आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांचे दर्शन घेतले. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले असून मुलींच्या अनुपस्थितीवर लोकांनी टिका व्यक्त केली आहे.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी चमत्कार? भरधाव ट्रेनची धडक बसूनही गाय उठून उभी; VIDEO Viral

वृद्धाश्रमात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी न लावता फक्त व्हिडिओ काॅलवर त्याचे दृष्य पाहणे अनेकांना फारसे पटले नाही. लोकांनी यावर टिका केली आणि बदलत्या कौटुंबिक संबंधांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. सोनीपतच्या पश्चिम राम नगर येथील वृद्धाश्रमात राहणारे माजी कापड व्यापारी शिवचरण गुप्ता यांचे मंगळवारी निधन झाले. आजारी पडल्यानंतर अनेकदा त्यांनी मुलींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना शेवटचे एकदा आपल्या मुलींना पाहायचे होते. वृद्धाश्रमातील अधिकांऱ्यांनुसार, 20 दिवसांआधीच मुलींना वडिल आजारी असल्याची माहिती देण्यात आली होती, पण तरीही तीघींपैकी एकही मुलगी वडिलांना भेटायला आली नाही.

नेपाळ, मुंबई आणि उत्तर प्रदेशातून व्हिडिओ काॅल

शिवचरण यांना मुलगा नव्हता तर अनिता, निशा आणि प्रिया नावाच्या तीन मुली होत्या. यातील दोन मुली या शिक्षिका होत्या. वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिल्यानंतरही वेळ नाही असे कारण पुढे करत त्यांनी भेटायला येणे टाळले. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतरही एकही मुलगी वडिलांच्या अंत्यसंस्काराला आली नाही तर विधींचे 5,100 रुपये पाठवत व्हिडिओ काॅलवरच अंत्यसंस्कार दाखवा अशी मागणी त्यांनी केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये समोर अंत्यविधी सुरु असताना एक व्यक्ती फोनवर अंत्यसंस्काराचे दृष्य एका महिलेला म्हणजेच शिवचरण यांच्या मुलीला दाखवताना दिसून येतंय.

People often claim daughters always take care of their parents. But every situation is different. This father passed away in an old-age home, and his daughter couldn’t attend his last rites, asking on a video call to hurry up. Heartbreaking. 💔 pic.twitter.com/uzZIOdzog2 — Byomkesh (@byomkesbakshy) August 6, 2026

काशी विश्वनाथ मंदिरात बनावट पुजाऱ्याचा भांडाफोड; दर्शनासाठी मागितले ४ हजार रुपये, मग पोलिसांनी जे केलं… Video Viral

अस्थी घेण्यास दिला नकार

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींनी त्यांच्या अस्थी स्वीकारण्यासही नकार दिला. उलट वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी अस्थी गंगेत विसर्जित करण्याची विनंती केली. कुटुंबाच्या संमतीने, शिवचरण यांचे डोळे दाण करण्यात आले असून त्यांचे अंत्यसंस्कार देखील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरळीत पार पाडण्यात आले आहे. काळासोबतच नात्यांचे महत्त्व देखील किती बदलले आहे याचा उत्तम आरसा ही घटना दाखवून देते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father waited for daughters last goodbye but none attended funeral video call sonipat viral news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.