(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज हे नेहमीच व्हायरल होत असतात. यात धोकादायक स्टंट्स, अपघात तर काही थरारक घटनांच्या व्हिडिओजचा समावेश असतो. हे व्हिडिओ बऱ्याचदा थक्क करणारे असतात. मात्र सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही. यात भररस्त्यात दोन तरुणी अक्षरशः एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसून आल्या. त्यांची ही मारामारी पाहून रस्त्यावरचे सर्वच लोक हादरले. येथीलच एका व्यक्तीने त्याची ही मारामारी आपला कॅमेरात कैद केली आणि आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो आता व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं? चला जाणून घेऊयात.
मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी… गली बॉय चित्रपटातील हा संवाद प्रत्यक्षात डेहराडूनच्या रस्त्यावर दिसून आला. यात दोन तरुणी एकेमकांविरोधात भररस्त्यात भांडताना दिसून आल्या. दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरु होती. मुलींना रस्त्यावर अशा प्रकारे भांडताना पाहून आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्य वाटले. काहींनी त्यांना तोंडी बोलून त्यांच्यातील थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणाचेही काही ऐकले नाही आणि वाद सुरूच ठेवला.
हा सर्व प्रकार डेहराडूनच्या रस्त्यावर घडून आला. तरुणींमध्ये हा वाद एका प्रियकरामुळे सुरु असल्याचे उघड होत आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, या दोन्ही तरुणी कशा एकमेकींना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी झोडपत आहेत. दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरु होते. वादावादीबरोबरच दोघीनींही एकेमकांना लाथा मारल्या, धक्काबुक्की केली आणि अक्षरशः एकमेकींना झोडपून काढलं. तरुणीमधील या मारामारीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून लोक आता या व्हिडिओची फार मजा घेत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @meevkt नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘देवभूमीच्या देवी..रस्त्याच्या मधोमध भांडणा-या मुलींचा हा व्हिडिओ उत्तराखंडमधला आहे.. एकमेकांना खाली पाडून मारहाण करत आहेत.. तोंडातून शिव्या निघत आहेत.. भांडण करताना कपड्यांची काळजी नाही.. लोक बघत आहेत. दाखवा.. पोरांना सुद्धा लाज वाटेल अशी भांडणे.. कुठे चालला आहे समाज?’ असे लिहिण्यात आले आहे.
देवभूमि की देवियां..
बीच सड़क पर लड़ रही लड़कियों का ये वीडियो उत्तराखंड का है.. एक दूसरे को गिरा गिरा कर पीट रहीं.. एक से बढ़कर एक गालियां मुंह से निकल रहीं.. लड़ने में कपड़ों का भी ख्याल नहीं.. लोग तमाशा देख रहे.. ऐसी लड़ाई कि लड़के भी शरमा जाएं.. कहां जा रहा समाज?? pic.twitter.com/zlc7Tz4k4K— Vivek K. Tripathi (@meevkt) December 17, 2024
व्हिडिओ व्हायरल होताच यावर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “सरजी ये न्यू इंडिया के न्यू जनरेशन आता अशा लोकांमध्ये डर, शर्म, लाज-लज्जा नावाची कोणतीही गोष्ट नाही, तर तो खोटा शान का भौकाल, दिखावा व मारपीट” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल हे कळणे अवघड आहे की ही भांडणे खरी आहे की फक्त दोन मित्रांनी केलेली रील आहे! जेव्हाही त्याला संधी मिळते तेव्हा तो कॅमेरा बाहेर काढतो आणि व्हिडिओ बनवू लागतो! ती एक फॅशन बनली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.