Beggar Viral Video : घोड्याला मारणारं इन्जेक्शन पाहताच, तो ताडकन उभा राहिला अन् घोड्यालाही लाजवलं असा पळू लागला, सौजन्य : एक्स
भिकारी म्हणजे काय? याची व्याख्या अद्याप कोणालाच सापडलेली नाही. ज्याला हात, पाय नाहीत, किंवा त्याला दृष्टी नाही तो मनात नसतानाही परिस्थितीमुळे भीक मागतो, हीच काय ती, शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला सांगण्यात येणारी एकमेव व्याख्या होय. पण याच गोष्टीचा फायदा काही आयुष्टात कष्ट न करू इच्छिणारी माणसं करतात.
हात-पाय धडदाकट असतानाही काही तरी क्लुप्त्या करत ते भीक मागत आरामाचं घाणेरडं जगण जगू इच्छितात. एकप्रकारे त्यांना कष्ट करण्याचा कंटाळाच असतो म्हणा, फक्त चेहऱ्यावर साळसूदपणाची लाचारी आणत ते जगाला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक बनावट भिकारी व्हायरल व्हिडियोच्या (Beggar Viral Video) ट्रेंडमध्ये आहे.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओनुसार ही व्यक्ती आपल्याला पॅरालिसिस (पक्षाघात) झाल्याचं नाटक करत लोकांकडे भीक मागायचा. त्याचा हा खोटेपणा काही जणांच्या निदर्शनास आला. आता समाजात आजही अशी काही माणसं आहेत, ज्यांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाहीत. ते खोटं बोलणाऱ्यांचा बुरखा हाणून पाडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.
या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीसं समोर आलं आहे. ते लोकांना गंमतशीर वाटत असलं तरी अशा लोकांची भीक मागण्याची प्रवृत्तीसमोर आली आहे. ही अशी प्रवृत्ती, ज्यामुळे खरंच गरीबीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी घातक ठरत आहे. जे खरंच एखादं कष्टाचं काम करू शकत नाही, अशा लोकांबाबतही संशय निर्माण करण्याचं काम करत आहे. त्यामुळे समाजातील अशा लोकांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती पोटावर जमीनीवर झोपलेली आहे. हातात पैसे मागण्यासाठी लागणारं ताट, शरीराची हालचाल होत नसल्याचं नाटक व चेहऱ्यावर साळसूदपणा. त्याचा हा खोटेपणा काही जणांच्या लक्षात आला. आता कोणत्याही पुराव्याशिवाय त्याला हटकन त्यांना योग्य वाटलं नाही, मग काय त्यांनी एक क्लुप्ती केली. ज्यामुळेचं त्या व्यक्तीचा पोलखोल होऊ शकला.
“Paralyzed” Beggar Runs at Full Speed After Being Offered Treatment for Paralysis. https://t.co/7sDuOlM5f3 — WarMonitor (@WarMonitorINTL) October 26, 2026
या भीक मागणाऱ्या व्यक्तीने आपले दोन्ही पाय एका कपड्याने ढाकले होते. याच वेळी एक व्यक्ती तिकडे येतो. तो व्यक्ती त्या भिकाऱ्याकडे त्याच्या आजाराबाबत विचारपूस करतो. दरम्यान, खोटं बोलता बोलता तो व्यक्ती आपल्याच जाळ्यात फसतो.
तो व्यक्ती त्या भिकाऱ्याला विचारतो की, तुला हा आजार केव्हा झाला. तू डॉक्टरला दाखवलं होतंस का? त्यावर उपचार केलास का? त्यावर उत्तर देता देता पुढे पुढे काय म्हणावं असं त्याला सुचत नाही. मग तो भिकारी त्या व्यक्तीला टाळू लागतो. कॅमेरा सोबत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हालचालीवर संशय येतो. तेथूनच एक गंमतीशीर ट्रॅक घडतो.
Dubai Viral Gold Dal : सोन्याचा तडका अन् डाळीचा रुबाब ! दुबईत मिळते 24 कॅरेट डाळीचा व्हिडिओ व्हायरल
थोड्या वेळाने ती व्यक्ती पुन्हा येते व आपल्या खिशातून जनावरांना खासकरून घोडे, बैल यांना लावण्यात येणारा इंजेक्शन खिशातून काढतो. हे इंजेक्शन तू घे. तुझा आजार ठिक होईल असे बोलताच तो भीक मागणारा व्यक्ती काही काळ स्तब्ध होतो. तसेच त्याच्या हातातील तो भलामोठा इंजेक्शन पाहताच काय करावे करू नये असे त्याचे होते. ती व्यक्ती इंजेक्शन घेऊन जशी पुढे जाते, तशी भीक मागणारी व्यक्ती पटकन उभी राहून घोड्याच्याही वेगाने पळू लागते.
हा व्हिडीओ @WarMonitorINTL नावाच्या इंन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या एक्स व इतर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.
व्हिडीओला पाहून नेटिझन्सला हसण अनावर झालं आहे. काही सोशल मीडिया युजर्सने छानशा कमेंटही दिल्या आहेत. एक यूजर लिहितो की, या उपचाराने निश्चितपणे काम केले. दुसरा लिहितो की, एक क्षण तो जमिनीवर असतो आणि पुढील क्षणी तो ट्रेनपेक्षा ही जोरात धावतो. इतर एक यूजर्स लिहितो की, औषधाने आपलं काम चांगलंच केलं.
Ans: पॅरालिसिस झाल्याचे भासवून रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ans: एक व्यक्ती जमिनीवर पडून भीक मागताना दिसते. दुसरी व्यक्ती त्याच्याशी संवाद साधते आणि इंजेक्शन दाखवते. त्यानंतर भीक मागणारी व्यक्ती अचानक उठून पळू लागते.
Ans: हा व्हिडीओ @WarMonitorINTL या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.






