(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियाची क्रेझ लोकांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी धोकादायक गोष्टी करू पाहतात, असे करताना ते मागेपुढे पाहत नाहीत. आपला जीव धोक्यात घालून केलेले हे स्टंट्स बऱ्याचदा लोकांच्या जीवावर बेततात. याच्याशी संबंधितच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आता वेगाने व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यात सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात तरुणीला ट्रेनने धडक मारल्याचे दिसून येत आहे. या अपघतात तरुणी जखमी झाली असून तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नक्की प्रकरण काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
सदर व्हायरल व्हिडिओ हा तैवानच्या चियाई येथील आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील थरार हा काही साधा नाही. विशेष म्हणजे, या रेल्वे ट्रॅकवर लोंकांनी रस्ता ओलांडू नये असा साइन बोर्ड लावल्याचे दिसून आले मात्र तरीही याकडे दुर्लक्ष करत तरुणी इकडे आपली सेल्फी काढू लागली. ही एक सेल्फी तरुणीला बरीच महागात पडली. या घटनेत तिचा जीव जाण्याचीही शक्यता होती मात्र सुदैवाने असे काही घडले नाही आणि थोडक्यात तिचा जीव बचावला.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला ट्रेनजवळ उभी राहून सेल्फी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलेचा हा निष्काळजीपणा तिच्यासाठी धोकादायक ठरला. महिला पर्यटक सुट्टीच्या काळात अलिशान फॉरेस्ट रेल्वे ट्रेनजवळ उभी राहून सेल्फी घेत होती. आपल्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत धोकादायक असू शकते याची त्या महिलेला पूर्ण कल्पना नव्हती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला ट्रेनजवळ उभी राहताच ट्रेन चालक तिला सावध करण्यासाठी हॉर्न वाजवतो. पण ती इतकी तल्लीन होती की तिला काहीच ऐकू येत नव्हते. पाहू शकता की, सेल्फी काढण्यात व्यस्त असलेली ही महिला ट्रेनने जोरदार धडकली आणि तिथेच पडली. या अपघातात महिलेच्या पायाला दुखापत झाल्याने समजते.
Woman in Taiwan miraculously survives getting hit by a locomotive when she posed for a selfie on December 14.
The 55-year-old suffered a broken foot.
She’s lucky to be alive.pic.twitter.com/dfwfjElI7n
— Paul A. Szypula 🇺🇸 (@Bubblebathgirl) December 16, 2024
अपघाताचा हा व्हिडिओ @Bubblebathgirl नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘तैवानमधील महिला 14 डिसेंबर रोजी सेल्फीसाठी पोझ देत असताना लोकोमोटिव्हच्या धडकेतून चमत्कारिकरित्या बचावली, ती भाग्यवान आहे की जिवंत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले नातं व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ट्रॅक्सच्या इतक्या जवळ का उभे राहायचे? हॉर्न खूप जोरात वाजत होता, गेट ऑफ द वे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही सहानुभूती घेण्यास पात्र नाही, तिने हे सर्व स्वतःहून ओढाहून घेतले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.