Viral Video: उपवासाच्या थाळीत सापडल्या माश्या; मालकाचे उत्तर ऐकून नेटकरी संतापले म्हणाले...
सोशल मीडियावर रोज काही ना काही विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा अशा गोष्टी पाहिल्यावर एकतर आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी आपले मनोरंजन होते. कधी डान्स रील्स, तर भांडणाचे व्हिडिओ, जुगाडाचे, स्टंटचे व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. याशिवाय जेवणामध्ये किडे, ब्लेड सापडल्याचे व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहिल्यावर संताप येतो. सध्या सोशल मीडियामुळे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गाजियाबादमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओनुसार, गाझिबादमधील एका ग्राहकाला मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये माशा आढळून आल्या. यानंतर ग्राहकाने तक्रार केल्यावर दुकानदाराने असे काही उत्तर दिले की, ज्यामुळे ग्राहकने संताप व्यक्त केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ग्राहक दुकानदाराकडे उपवासाच्या थाळीमध्ये माशा सापडल्याची तक्रार करत आहे. यावर दुकानदार त्याला उलट उत्तर देतो. तो म्हणतो की कोणत्या प्रकारची माशी सापडली या तो ग्राहक चिडतो. तर दुकानदार पुन्हा एकदा वरचढ होऊन म्हणतो की, दिवाळीची माशी असेल. तर ग्राहक आणखी चिडतो आणि त्याची तक्रार पोलिसांकडे केली जाईल म्हणतो. तरीही दुकानदार आपली चुक मान्य करत नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील संतापलेले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Madan Sweet’s Owner and Customers over Customer’ found Out Mosquitoes inside Food
pic.twitter.com/rOSN6ajDXc— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 12, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहिल्यावर अनेकांनी संतप्त अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पोलिसांनी बदडल्यावर त्याच्या लक्षात येईल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे अशा घटना खूप वाढल्या आहेत प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे, तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याला कळत नाही का ग्राहक हा देव असतो त्याच्यामुळेच त्याची कमाई होते आणि तो इतका उद्धट बोलत आहे, तर अशा लोकांना लायसन्स कोण देते असा प्रश्न एकाने विचारला आहे.