फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षिकांचा आहे. या शिक्षिकांनी एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शिक्षक नेहमी विद्यार्थयांवर रागावलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते. पण ते देखील एक माणूस आहेत, त्याला नाचायला, गाणे आणि जीवनाचा आनंद घेणे देखील आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शिक्षक असेच करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षक दिनाचा आहे. हा व्हिडिओ पाहू शकता की, एका शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम चालू आहेत अनेक विद्यार्थी तिथे जमलेले आहेत एक विद्यार्थी ॲंकरिंग करत आहे. स्टेजवर तीन शिक्षिका दिसत आहेत. त्यांना बहुतेक डान्स करायला सांगितले आहे. बॅरग्रांऊडमध्ये गाणे सुरू आहे. गाणे सुरू होताच त्यातील एक शिक्षिका डान्स करायला सुरूवात करतात. तर दुसऱ्या दोन शिक्षिका लाजत असतात. पण त्या देखील नंतर डान्स करायला सुरूवात करतात. तेरी बातो में उलझा जिया या गाण्यावर त्या डान्स करत असतात. नंतर इतर दोन शिक्षिकामधेच थांबतात आणि मग एक पिवळ्या साडीत असलेले शिक्षिका डान्स करतात. सगळे विद्यार्थी कडकडून टाळ्या वाजवत ओरडत त्यांना प्रोत्साहित करत असतात. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
हे देखील वाचा- Viral Video: व्यक्तीने जुगाड करून बनवली अशी वॉशिंग मशीन की; पाहून लोक म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ त्या शिक्षिकांपैकीच एक शिक्षिकेने deepanjalichetia या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की,शो स्टॉपर शिक्षक, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मॅम तुमच्या नृत्याने मला प्रेरणा दिली, तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मॅम तुम्ही खूपच छान डान्स केला आहे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, शिक्षकांमध्ये देखील अप्रतिम टॅलेंट असते, फक्त त्यांना एक संधी मिळाली पाहिजे.तसेच एकाने म्हटले आहे की, आई नंतरचा दुसरा गुरू म्हणजे शिक्षक, त्यांचे मार्गदर्शन खूप महत्तावाचे असते.
हे देखील वाचा- Viral Video: रावण दहनाआधीच लंकापतीचा पुतळा धापकन आदळला अन्…; पाहा व्हिडिओ