मित्रानेच शूट केला मित्राच्या मृत्यूचा व्हिडिओ; पाण्यात आंघोळ करायला गेला अन् घडलं भलतंच... थरारक Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन घटना शेअर केल्या जातात, माहितीसाठीचे हे एक वेगवान साधन आहे. आजकाल अनेक बातम्या या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कमी वेळेत पोहचत असतात. अशीच एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यात एका व्यक्तीच्या मृत्यूचे लाइव्ह दृश्य दिसून आले. मुख्य म्हणजे हे थरारक दृश्य त्याचा मित्रच आपल्या मोबाईलच्या कैमरात कैद करत होता. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
भर रस्त्यात नवरा-बायकोची जोरदार भांडण; एकमेकांची नरडी आवळली अन्…, VIDEO तुफान व्हायरल
काय घडलं व्हिडिओत?
घटना हरिद्वारच्या ज्वालापूर पोलीस स्टेशन परिसरातील गंगानहरमधील आहे. यात एका तरुणाचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला आहे. तरुण मित्रांसोबत फिरायला गेला असता पाण्यात पोहण्याचा मोह त्याला आवरता येत नाही आणि यानंतर तो कोणताही विचार न करता पाण्यात उडी मारतो आणि पाण्यात पोहू लागतो. त्याचा मित्र हे सर्व दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करत असतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात व्यक्ती पाण्यात उतरून हळूहळू पुढे जाताना दिसतो मात्र काही अंतरावर जाताच तो काही क्षणातच पाण्यात बुडू लागतो. माहितीनुसार, पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याला शवविच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. घटनेचे हे थरार दृश्य आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केले जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @ndtvindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आले असून लोक यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लाज वाटायला हवी, मित्राच्या मृत्यूचा व्हिडिओ बनवत आहे, याउलट तू त्याचा वाचवायला हवं होत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही कसली मैत्री आहे की मित्रापेक्षा व्हिडिओ बनवणे जास्त महत्त्वाचे वाटले?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कृपया करून आग आणि पाण्याला हलक्यात घेऊ नये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.