Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral

Funny Birthday Celebration Video : केक फुटला आणि हवेत आनंदही गेला उडून... अनोख्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यातील दृश्यांनी सर्वांनाच हसू अनावर केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 26, 2026 | 02:38 PM
वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक... Video Viral

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवस साजरा करताना केकला मेणबत्ती लावताच अचानक स्फोट झाला.
  • केकचे तुकडे सर्वत्र उडाले आणि वाढदिवसाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही पडले.
  • हा व्हिडिओ प्रँक असल्याचा संशय असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
सोशल मिडियाच्या दुनियेत कधी काय घडून येईल ते सांगता येत नाही. इथे अनेक मजेदार दृष्ये आणि रंजक घटना शेअर केल्या जातात. अलिकडे एक अनोखं बर्थडे सेलिब्रेशन इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात सेलिब्रेशनचा आनंद क्षणातच धुळीत मिळाल्याचे दिसून आले. व्हिडिओतील दृष्यांनी आता अनेकांना थक्क केलं आहे तर काहींना हसू अनावर केलं. पण नक्की व्हिडिओत घडलं तरी काय ते चला सविस्तर जाणून घेऊया.

लवकरच मोठं संकट ओढवणार? Viral Video मध्ये असं काय दिसलं ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरलं…

काय घडलं व्हिडिओत?

सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्तीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा होत असल्याचे दिसते. उत्सवमूर्ती व्यक्ती ज्याचा वाढदिवस आहे तो खुर्चीवर बसलेला असतो. त्याच्या डोक्यावर कागदाचा एक क्राऊन देखील घातल्याचे दिसते. अशातच एक नातेवाईक केकवर मेणबत्ती पेटवण्यासाठी पुढे येतात. जशी ही मेणबत्ती केकवर पेटवली जाते त्याच्या पुडच्याच क्षणी केकचा मोठा विस्फोट होते आणि त्याचे तुकडे सर्वत्र पसरतात. इतकेच काय तर ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीाच्या चेहऱ्यावरही संपूर्ण केकचे शिंतोडे उडतात. आता कसं घडलं याची खात्रीशीर माहिती नसून हा एक प्रँक असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे.

मुळात केक सहसा फुटत नाही अशात मेणबत्ती लावताच फुटलेला हा केक खरंतर खोटा असावा असा अनेकांचा समज आहे. खरे कारण मात्र व्हिडिओत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान सेलिब्रेशनवेळी अचानक घडलेली ही घटना आता यूजर्सना हसू अनावर करत आहे. लोक निरनिरळ्या प्रतिक्रिया व्यक्त करुन वाढदिवशी घडलेल्या या घटनेची खिल्ली उडवत आहेत.

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल

दरम्यान हा व्हिडिओ @vikramgfans नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बर्थडे केक नाही हा तर निघाला बर्थडे बाँम्ब” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्बाड चित्रपटातील हस्तरसारखा त्याचा चेहरा झाला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून कुठल्याही दुकानातून केक खरेदी करायचा नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny birthday celebration video cake exploit in front of birthday boy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Birthday
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.