(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्हाला सुमारे ८० वर्षांची एक वृद्ध महिला बस स्टॉपवर एकटी रडताना दिसत आहे. जेव्हा रस्त्याने जाणाऱ्यांनी वृद्ध महिलेला तिच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा वृद्ध महिलेने जे सांगितले ते ऐकून सर्वांचेच हृदय कोलमडले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणत आहे की या वृद्ध महिलेला तिच्या मुलाने बस स्टॉपवर सोडले होते आणि तो तिथून पळून गेला होता. वृद्ध महिलेचा मुलगा व्यवसायाने शिक्षक आहे परंतु त्याने त्याच्या आईला कुटुंबातून काढून टाकले आणि तिला बस स्टॉपवर सोडून दिले.
ती महिला म्हणत असल्याचे दिसते की तिला तिच्या मुलीच्या घरी जायचे आहे. तथापि, तिच्या चेहऱ्यावर भीती, एकटेपणा आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून येते. या वयात, जेव्हा तिला आधाराची आवश्यकता असते, तेव्हा तिला स्वतःचा मार्ग शोधण्यास भाग पाडण्यात आले आहे आणि तेही तिच्या पोटच्या मुलाकडून… मुलाचे हे कृत्य अनेकांना आता राग अनावर करत असून महिलेच्या अवस्थेने सर्वांनाच भावूक केला. घटनेचा व्हिडिओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Elderly Mother aged 80 Abandoned at Bus Stand in Mandsaur by son after pressure from his wife The idea of family losing its meaning?
Are aging parents become inconvenient liabilities in their own homes? This incident is not an isolated case. It reflects a growing moral crisis… pic.twitter.com/Cjsemah4AE — Woke Eminent (@WokePandemic) February 4, 2026
व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी या महिलेशी संपर्क कसा साधू शकेन? मला तिला मदत करायची आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हृदयद्रावक आणि लाजिरवाणे. पालक आपले संपूर्ण आयुष्य आपली काळजी घेण्यात घालवतात, आणि वृद्धापकाळात त्यांना सन्मानाची गरज असते, दुर्लक्षाची नाही. जर एखादा समाज आपल्या वृद्धांना ओझे मानत असेल, तर काहीतरी खूपच चुकीचे आहे. कुटुंबाने सर्वात दुर्बळांचे संरक्षण केले पाहिजे, त्यांना सोडून दिले नाही पाहिज”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






