
Rapido Love Story ( रॅपिडो लव्ह स्टोरी )
या जोडप्याने ‘ऑफिशियल पीपल ऑफ इंडिया’ (Official People of India) या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या नात्या विषयी कबुलीदेत व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ त्यांनी यामध्ये आपला नात्यातल्या प्रवास बद्दल सांगितले. कोरिओग्राफर असलेल्या एकताने सांगितले की, तिची पहिली ‘रॅपिडो’ राईड तिच्या आयुष्यातील इतका महत्त्वाचा टप्पा ठरेल, याची तिला कल्पना देखील नव्हती.
“मला माहीत नव्हते की यामुळे माझे आयुष्य बदलून जाईल,” असे ती व्हिडिओ मध्ये म्हणाली आहे. प्रवासादरम्यान एकताला समजले की, पार्थ एक खेळाडू आहे ज्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आर्थिक अडचणींमुळे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करून खेळातील कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी त्याने ‘रॅपिडो’मध्ये चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
खेळाप्रती असलेली त्याची निष्ठा एकताच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली. राईड संपली असली तरी, एकताच्या मनात सतत पार्थचा विचार येत होता आणि तिने त्याच रात्री त्याला संपर्क करण्याचा निर्णय घेतला.
“त्याने मला माझ्या राहत्या ठिकाणावर सोडले, पण माझ्या मनात त्याचा विचार येतच राहिला,” असे तिने सांगितले. एकताने पुढाकार घेत पार्थला मेसेज केला. त्यांच्यातील संवादातून भेटीगाठी वाढल्या आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते एकमेकांसोबत वेळ घालवू लागले.
पार्थला त्याच्या प्रशिक्षणासाठी वेळ काढायचा होता, तर एकताला रिहर्सल आणि कोरिओग्राफीच्या कामात व्यस्त राहावे लागत असे. अत्यंत धावपळीच्या दिनचर्येतही ते एकमेकांना भेटत राहिले आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ लागले.
एकता म्हणाली, “आम्ही वारंवार भेटू लागलो; त्याच्या प्रशिक्षणाच्या आणि माझ्या रिहर्सलच्या मधल्या वेळात आम्ही एकमेकांसाठी काही क्षण चोरून काढायचो. या संवादांच्या दरम्यान, आम्ही एकमेकांसाठी एक हक्काचे घर (आधार) बनलो.”
जसजसे त्यांचे नाते बहरत गेले, तसतसे दोघेही आपापल्या व्यावसायिक ध्येयांच्या दिशेने वाटचाल करत राहिले. गेल्या वर्षी पार्थने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Championship)भारताचे प्रतिनिधित्व केले, तर एकताला रणवीर सिंगसह अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली.
या जोडप्याने सांगितले की, त्यांच्या या प्रवासाने त्यांना एकत्र प्रगती करण्यास मदत केली आणि त्यांनी एकमेकांच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला. एकतासाठी, जी एक सामान्य राईड म्हणून सुरू झाली होती, ती तिच्या आयुष्यातील एक अनपेक्षित आणि सुंदर वळण ठरली.
Ans: रॅपिडो बाईक राईडदरम्यान दोघांची पहिली भेट झाली.
Ans: एकता ही कोरिओग्राफर असून तिने बॉलिवूडमधील कलाकारांसोबत काम केले.
Ans: पार्थ हा खेळाडू असून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले.