
"मी तुझी मैत्रीण होऊ शकते का?" बायकोने फेक आयडीवरून नवऱ्याला केला असा प्रश्न... उत्तर वाचताच उठला हास्याचा कल्लोळ
नक्की काय घडलं?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका पत्नीने बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करून आपल्या पतीला मेसेज केला. अनोळखी स्त्री असल्याचे भासवत तिने विचारलं, “मी तुमची मैत्रीण होऊ शकते का?” या प्रश्नावर पतीने अगदी सभ्यपणे उत्तर दिले, “माफ करा, मी विवाहित आहे.” हे उत्तर पाहताच आई आणि मुलगी दोघीही खळखळून हसू लागतात. @dreamy_tanvi7 या इंस्टाग्राम हँडलवर हा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला व्हिडिओमध्ये आई-मुलगी खोलीत बसून हसत गप्पा मारताना दिसतात. त्यानंतर मुलगी संपूर्ण घटना सांगते. आईने फेक अकाउंट तयार करून आपल्या पतीला म्हणजेच मुलीच्या वडिलांना मेसेज पाठवला होता, हे ती उघड करते.
पहिल्या उत्तरावर समाधान न मानता, पत्नीने आणखी थोडा खेळ वाढवला. त्या बनावट खात्यातून ती पुन्हा मेसेज करते, “काही हरकत नाही… आपण तरी कुठेतरी भेटू शकतो का?” यावर पतीचा खुसखुशीत पण विश्वासू प्रतिसाद येतो, “मी माझ्या पत्नीला विचारतो आणि मग सांगतो.” हे वाचताच आई-मुलगी दोघीही दुप्पट हसू लागतात. पुढच्याच क्षणी पतीने स्वतःच्या पत्नीला फोन केल्याचेही व्हिडिओत दिसते. पतीची प्रामाणिकता आणि निरागसता पाहून हा संपूर्ण प्रसंग आणखी मजेदार वाटतो.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, “माझ्या आयुष्यातही असा विश्वासू माणूस हवा!” तर दुसऱ्याने मजेत म्हटले, “ही आई तर सुपर कूल आहे.” काही जणांनी तर पतीच्या आत्मविश्वासावर चिमटा काढत लिहिले, “आता काका त्यांच्या ग्रुपमध्ये बोलतील आजही माझा करिश्मा कायम आहे!” तर एकाने प्रतिक्रिया दिली, “यावेळी वफादारीचा लेव्हल अगदी टॉपवर होता.” एकंदरीत, हा संपूर्ण व्हिडिओ नुसता मजेशीर नाही तर नात्यातील विश्वास आणि खेळकर संवादाची गोड झलकही दाखवतो. म्हणूनच तो इतक्या वेगाने लोकांच्या मनात घर करून व्हायरल झाला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.