(फोटो सौजन्य: Instagram)
रुग्णालयातील साध्या वातावरणात झाले लग्न कोच्ची येथील वीपीएस लेकशोर रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात हा सोहळा झाला. कुठलीही सजावट नव्हती, गोंधळ नव्हता फक्त डॉक्टर, नर्सेस आणि काही जवळचे नातेवाईक एवढीच उपस्थिती. शाळेत शिकवत असणाऱ्या वधूने आणि इंजिनिअरिंग कॉलेजात प्राध्यापक असलेल्या वराने परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी एकमेकांचा आधार बनण्याची प्रतिज्ञा केली. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, वधूसाठी हा दिवस आयुष्यातील विशेष होता आणि अपघातही याच दिवशी झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची इच्छा मान्य करून रुग्णालयाने इमर्जन्सी विभागातच लग्नाला परवानगी दिली.
शुक्रवारी दुपारी लग्न होणार होते. पण पहाटे तीनच्या सुमारास वधू मेकअपसाठी जात असताना गाडी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन झाडाला धडकले. जखमींना प्रथम कोट्टयम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र वधूच्या पाठीच्या कण्यात गंभीर दुखापत असल्याने तिला जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या लेकशोर रुग्णालयात हलवावे लागले. अपघाताची बातमी मिळताच वर आणि त्यांचे कुटुंब तात्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी डॉक्टरांशी चर्चा करून ठरल्याप्रमाणे याच दिवशी लग्न करण्याची विनंती केली आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या सोयीनुसार व्यवस्था केली.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






