मोलकरणीने स्वयंपाकघरातील भांड्यात लघवी करून मळले पीठ; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य-X)
घर काम करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घरी जेवण बनवण्यासाठी येणाऱ्या महिलेने केलेलं कृत्य वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका सोसायटीमधील कुटुंबात जेवण बनवण्यासाठी येणाऱ्या एका महिलेने चपातीसाठी पीठ मळताना पाण्याऐवजी लघवीचा वापर केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ती जेवण बनवणारी महिला त्या कुटुंबात गेल्या आठ वर्षांपासून काम करतं आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका सोसायटीतील ही घटना घडली. जिथे घरातील मोलकरीण स्वयंपाकघरातील भांड्यात लघवी करताना कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, जेव्हा हा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला तेव्हा लोकांनी महिलेवर जोरदार टीका केली आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या क्रॉसिंग रिपब्लिकमधील एका सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या मोलकरणीवर भांड्यात लघवी करून रोटी बनवल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी एसीपी वेव्ह सिटी लिपी नागायच यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मोलकरणीला अटक करण्यात आली आहे. नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, रीना नावाची मोलकरीण सुमारे 8 वर्षांपासून तिच्या घरी काम करते. तिच्या हालचाली संशयास्पद असल्याने मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.
व्हायरल क्लिपमध्ये ती एका भांड्यात लघवी करते आणि त्यात पीठ घेऊन रोटी बनवताना दिसत आहे. महिलेने सांगितले की, तिच्या कुटुंबातील सदस्यांना काही महिन्यांपासून यकृताचा त्रास होत आहे. या कारणास्तव कुटुंबातील सदस्यांनी मोलकरणीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.यानंतर त्या महिलेने घृणास्पद कृत्य केलेचं आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
हा व्हिडिओ @SachinGuptaUP ने X वर पोस्ट केला आहे. त्यांनी दावा केला – गाझियाबाद, यूपीमध्ये स्वयंपाकघरातील भांड्यात लघवी करतानाचा व्हिडिओ. घरगुती मोलकरणी रीनाला अटक! या प्रकरणावर लोकांनी महिलेला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आणि आता या व्यक्तीला काय झाले आहे असा सवाल केला. तर दुसऱ्याने लिहिले की लोकांची मानसिकता आजारी आहे.
गाजियाबाद, यूपी में रसोई के बर्तन में पेशाब करने का Video –
घरेलू सहायिका रीना गिरफ्तार है !! https://t.co/snT4sVWDHh pic.twitter.com/9FyU4nzSWG
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 16, 2024
यासोबतच त्यांनी आणखी एक पोस्ट केली आणि लिहिले – गाझियाबाद, यूपीमध्ये, घरगुती नोकर रीना स्वयंपाकघरातील भांड्यात शौच करताना पकडली गेली. ती लघवी असलेल्या भांड्यात पीठ मळायची आणि संपूर्ण कुटुंबाला चपाती जेवणात वाढयाची. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब आजारी पडले आहे. संशयावरून किचनमध्ये मोबाईल बसवून व्हिडीओ तयार करण्यात आला आणि रीनाला रंगेहात पकडण्यात आले. एफआयआर दाखल करण्यात आला आहे.