एकदमसे वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए! तरुणीने केलं असं काही... Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही प्रँक व्हिडीओ देखील असतात. आता प्रँक व्हिडिओ म्हणजे काय ते जाणून घेऊयात. खरं तर, एखादी व्यक्ती रस्त्यावर अनोळखी लोकांसोबत विनोद करतो ज्याबद्दल त्यांना माहिती नसते. यानंतर त्यांची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाते की कोणाची प्रतिक्रिया काय आहे हे यात कॅप्चर केले जाते. सध्या असाच मजेशीर प्रँक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक तरुणी भररस्त्यात लोकांसोबत असा काही प्रँक करते की पाहून सर्वांनाच धक्का बसतो. यात नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी एका ठिकाणी उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी तिच्या हातात एक बोर्ड असून त्यावर ‘Slap Me’ असे लिहिण्यात आले आहे. याचा अर्थ ती लोकांना स्वतःला एक चापट मारण्यास सांगत आहे. यानंतर अनेक लोक त्या मुलीकडे येतात आणि तिच्या गालावर खूप हलक्या हाताने मारतात. व्हिडिओच्या पहिल्या भागात असे काही घडताना दिसून येते. पण दुसऱ्या भागात भागात अशा काही गोष्टी घडतात की पाहून सर्वांनाच धक्का बसतो.
हेदेखील वाचा – धक्कादायक! बाल्कनी तुटताच दणादणा जमिनीवर आदळले लोकं, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
वास्तविक घडते असे की, थप्पड मारल्यानंतर लगेचच मुलगी बोर्ड फिरवते, जिथे लिहिले होते ‘100 रुपये काढा.’ जे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात. काही लोक तिला पैसे देतात तर काही लोक पैसे देण्यास नकार देतात. पण व्हिडिओचा शेवट खूपच सुंदर होता. ती मुलगी गरजू लोकांना अन्नपदार्थ देण्यासाठी पैसे मिळालेले खर्च करते. व्हिडिओ पाहून अनेकांना आनंद झाला तर काही हास्याने लोटपोट झाले. आजकाल असे प्रँकचे अनेक व्हिडिओज सोशल मीडिया शेअर होत असतात. लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडते.
हेदेखील वाचा – बापरे! व्यक्तीने बाईकच्या पेट्रोल टाकीत फटका टाकून पेटवला अन् मग जे झालं… धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @justlookatvd नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक्स देऊन यावर आपली पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेवटी हृदय जिंकले, गुड जॉब” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थप्पडाच्या कमाईतून दीदींनी काही गरजू लोकांना खाऊ घातला, तिच्यासाठी एक लाइक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान वाटले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.