
girl got hit by truck while changing lane see what happens next video viral
Viral Accident Video : सोशल मीडियावर तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही अपघात इतके भयंकर असतात की, पाहून थरकाप उडतो, तर काही अपघात थक्क करणार असतात. अशा गोष्टींवर अनेक मीम्स देखील व्हायरल होत असतात. विशेष करुन मुलींच्या ड्रायव्हिंगवर तर भरपूर मिम्स व्हायरल होतात. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीला ट्रकने जोरदार धडक दिली आहे, पण त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर गाड्यांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या गाड्या जात आहे. याच वेळी एक तरुणी स्कूटीवर निघाली आहे. पण गाडी चालवताना तरुणी अचानक लेन बदलून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या ट्रकला ती जोरदार धडकते आणि गाडीवरुन उडून पडते. तिची स्कूटर ट्रक खाली येते. परंतु तरुणी उडून पडल्यावर लगेच उठते. तिला कोणत्या प्रकारची दुखापत होत नाही. ही घटना पाहून आसपासचे गाडीस्वार थांबतात आणि तरुणीला काही लागले तर नाही हे तपासतात. तरुणी सुखरुप असते. परंतु तिच्या स्कूटीचे तुकडे झालेले असतात. तरुणीने हेल्मेट घातलेले असते यामुळे तिचा जीव वाचतो. या घटनेतून वाहतूकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. सध्या या व्हिडिओवरुन मिम्स तयार केले जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
📸📸 CCTV-Captured Footage pic.twitter.com/AfHtMK6p9c — Mohini (@MohiniWealth) November 9, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MohiniWealth या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर यमराज सुट्टीवर होता वाटतं असे म्हटले आहे, तर एका युजरने पाप की परी बच गयी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने दिदी हेव्ही ड्रायव्हर आहे असे म्हटले आहे. तर एकाने वाह दिदी वाह असे म्हटले आहे. ही घटना कुठे घडली हे स्पष्ट नाही, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.