निष्काळजीपण नडला! सफारीदरम्यान गाडीतून सेल्फी घेत होती महिला; तेवढ्यात सिंहाने हात जबड्यात धरला अन्... भयावह Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ह पाहू शकता की, एक महिले ओपन जीपमधून सफारीचा आनंद घेत आहे. यावेळी ती व्हिडिओ काढण्यासाठी जीपमधून हात बाहेर काढते. याच वेळी तिथून एक सिंह जात असतो. हे दृश्य पाहताच सिंह अचानक धावू लागतो. एक लांब अशी झेप घेत सिंह महिलेचा हात पकडतो आणि महिलेला बाहेर ओढतो. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की, महिला फरपटली गेली आहे. गाडी काही अंतर पूढे जाऊन थांबते. यावेळी सिंह महिलेवर हल्ला मात्र नंतर करत नाही. परंतु महिला गाडीतून ओढली गेली असल्याने तिला चांगलेच लागले असण्याची शक्यता आहे.
व्हायरल व्हिडिओ
pic.twitter.com/A1elrmiCi9 — Photographer (@photo5065) November 8, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @photo5065 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु अनेकांनी हा व्हिडिओ AI द्वारे बनवला गेला असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. पण तरिही कोणी या घटनेवर विश्वास ठेवायला तयार नाही. शिवाय अशी घटना घडल्याचे कोणतेही वृत्त देखील समोर आलेले नाही. ही घटना कधी व कुठे घडली याची माहिती देखील अद्याप अस्पष्ट आहे. पण काहींच्या मते या व्हिडिओतून शिकण्यासारखे आहे की अशा धोकादायक सफारीदरम्यान आपली एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






