बापरे! चिमुकल्याला उचलले अन् धाडकन जमिनीवर आपटले, पाहूनच अंगावर काटा येईल, Video Viral
लहान मुलं ही फार कोमल असतात. आपल्याला वाटणारी लहान गोष्ट त्यांच्या मोठी दुखापत करू शकतात अशात त्यांच्यासोबत वावरताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. अनेकवेळा आपण लहान मुलांशी त्यांच्याप्रमाणेच लहान होऊन वागायला लागतो. त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, आपल्याला त्यांच्याबरोबर खेळावे लागेल आणि त्यांच्याशी मजामस्ती करावी लागेल. पण कधी कधी आपली ही मजा त्यांच्या जीवावर बेतू शकते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.
भाऊ-बहीण म्हटलं की, मजा मस्ती ही आलीच. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही भावा-बहिणीमध्ये सुरु असलेली मस्ती दिसून येत आहे मात्र पुढच्याच क्षणी ही मस्ती एक वेगळेच वळण घेते आणि असे काही होऊन बसते ज्याचा कोणी विचारही केला नसावा. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क करतील. व्हिडिओत नक्की काय घडले चाल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मुलगी एका खोलीत लहान मुलासोबत खेळत असल्याचे दिसत आहे. बहुदा हा तिचा लहान भाऊ असावा. मुलाच्या हातात एक दोरी आहे जी एका बाजूने मुलगा आणि दुसरीकडून मुलगी ओढत आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या या खेळात अचानक मुलगी त्या मुलाला पकडून मस्तीत आपल्या कुशीत घेऊन बघते मात्र तितक्यात तिचा तोल ढासळतो आणि हात एका बाजूने निसटल्याने तिच्या हातातील तो चुमुकला जोरदार जमिनीवर आपटतो. खाली पडल्याने मुलाच्या डोक्याला दुखापत होते आणि तो रडू लागतो. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली आणि नंतर मुलाला आपल्या खांद्यावर उचलून दुसऱ्या खोलीत घेऊन जाते.
आपली एक शुल्लक मस्ती कशी जीवावर बेतू शकते किंवा दुसऱ्यांना दुखापत करू शकते याचे योग्य उदाहरण या व्हिडिओतून दिसून आले. हा व्हिडिओ @nautanki.hoon नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पडला तो आणि वेदना मला होऊ लागल्या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निष्काळजी महिला, एका रीलसाठी तिने मुलाचा जीव धोक्यात टाकला”.सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एका तरुणीने मस्ती मस्तीत चुमुकल्या मुलाला जमिनीवर आपटल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला हैराण करतील.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.