(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या कलियुगात दररोज अनेक धक्कादायक आणि जीवाची काहिली करणाऱ्या बऱ्याच घटना आपल्या समोर येत असतात. या घटना पाहून हेच हे कलियुग असे वाक्य आपल्या मनात येते. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यातील दृश्ये तुम्हाला तुम्हाला आवाक् करून सोडतील. असे म्हणतात माणसाला जिवंतपणी ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातना किमान मृत्यूनंतर त्याला भोगाव्या लागणार नाहीत मात्र इथे तर मृत्यूनंतरही शवाचे असे हाल केले जात आहेत की पाहून कोणाचेही हृदय हळहळेल. माणुसकीला काळिमा फासणारा हा व्हिडिओ सध्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
हा सर्व प्रकार झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडून आला. जिथे पोस्टमार्टेम हाऊसबाहेर दोन कर्मचारी मृतदेहाच्या पायाभोवती कपडा बांधून त्याचे शव ओढत/खेचत नेताना दिसून आले. या निर्दयी घटनेचा व्हिडीओ जवळील एकाने आपल्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत याबाबत तपास सुरू केला आहे. दरम्यान व्हिडीओत नक्की काय घडले? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
तर व्हायरल व्हिडीओत दिसून येते की, मृतदेहावर एक कपडा टाकण्यात आला आहे. यावेळी दोन व्यक्ती त्या मृतदेहाच्या पायानं खेचत एखाद्या वास्तूप्रमाणे मृतदेह रस्त्यावरून ओढत शवविच्छेदन गृहापर्यंत नेत आहेत. ते या मृतदेहाला इतक्या निर्दयपणे ओढून काढतात की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला होता. हा तोच मृतदेह; जो अतिशय निर्दयी, क्रूरपणे फरफटत रस्त्यावरून नेला जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच आता सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
झांसी के मेडिकल कॉलेज में शव को पोस्टमॉर्टम रूम से जानवर की तरह घसीटा जा रहा है. pic.twitter.com/1eDt0hgAdp
— Sheikh inzemam (@sheikh_inzemam) January 7, 2025
हा निर्दयी घटनेचा व्हिडिओ @sheikh_inzemam नावाच्या एक्स अकाऊंटवरून शशेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘झाशीच्या मेडिकल कॉलेजमधील पोस्टमॉर्टम रूममधून मृतदेह जनावरांसारखे ओढले जात आहेत’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा शवचा मृत्यू नसून संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्याने व्हिडीओ बनवला तो मृतदेह खेचणाऱ्याइतकाच दोषी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.