अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो, पण स्त्रिया दाखवून चालतात? - पर्स पांचट Jokes : मुलगा बाबांना विचारतो; बाबा पुरुष म्हणजे नक्की कोण ओ… ? उत्तर वाचाल हसू आवरणं कठीण होऊन बसेल अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही - नकाशा दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी… - डोळे लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे जी घालू शकत नाही? - मंगळसूत्र असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचे कान पकडतो? - चष्मा असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही ते वाचू शकत नाही? - भाग्य अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना की आवडत नाही? - पालकांचा मार किंवा ओरडा मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण? - मेणबत्ती किंवा पेन्सिल लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, पण ते मला कधीही खात नाहीत, ओळखा पाहू मी कोण? - प्लेट आणि चमचा प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे? - दिशा एवढस कार्ट घर कसं राखतं? - कुलूप सुपभर लाह्या, त्यात एक रुपया? - चंद्र आणि चांदण्या पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब? - कणीस दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते… - चप्पल अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते. - तहान अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते. - गरम मसाला एका राजाची अद्भुत राणी, दमादमाने पिते पाणी - दिवा रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही मला सांगा की ते काय आहे? - सावली असे काय आहे जेव्हा आपण जागे असतो तेव्हा ते पण जागे राहतात, आपण झोपल्यावर ते ही झोपी जातात - पापण्या असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो? पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही. - आडनाव चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी, आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी… - कॅरम बोर्ड गेम पांचट Jokes : श्रावणाच्या सभेत सर्व देवतांची मिटिंग झाली आणि मग एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला; वाचाल तर हसतच राहाल दोन अक्षरी नाव आहे नेहमी सर्दी असते नाकावर कागद माझा रुमाल आहे काय माझे नाव आहे...? उत्तर – पेन