Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी… लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

OMG Video : काय सांगता... लग्न सोडून वर गेला जेवणाची डिलिव्हरी करायला? व्हिडिओतील अनोख्या दृष्यांनी वेधलं यूजर्सचं लक्ष. काय खरं, काय खोटं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 01:54 PM
डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी... लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

डोक्यावर सेहरा, अंगावर शेरवानी... लग्नाआधी डिलिव्हरी करायला निघाला वर, पेट्रोल पंपावरील दृष्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या वेशात डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
  • व्हिडिओतील प्रसंग खरा नसून लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी केलेला स्क्रिप्टेड स्टंट.
  • पेट्रोल पंपावरील लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्समुळे व्हिडिओ चर्चेत.
लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी फार खास असतो. बाकी सर्व काम बाजूला ठेवून लग्नाच्या तयारीला यावेळी पहिले प्राधान्य दिले जाते. प्रथेनुसार तर लग्नाची हळद लागल्यावर लग्न लागेपर्यंत वर-वधूचे घराबाहेर जाणही बंद केले जाते. पण अलिकडच्या व्हिडिओमध्ये मात्र भलतेच दृष्य दिसून आले. आपल्या नेहमीच्या दिवसाप्रमाणे डिलिव्हरी बाॅय सामानाची डिलिव्हरी करायला निघाला पण यात ट्विस्ट म्हणजे स्वत:च्या लग्नाच्या दिवशीही तो आपले कर्तव्य विसरले नाही. व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बाॅय डोक्यावर सेहरा आणि अंगावर शेरवानी घालून सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी जाताना दिसला. एक वर आपले लग्न सोडून सामानाची डिलिव्हरी करत आहे हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि लोकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली. चला व्हिडिओत काय दिसलं ते जाणून घेऊया.

शिकार करायला गेला अन् क्षणात बेडकाने डावच पलटला, जंगलाच्या शिकाऱ्याला चावून खाल्लं अन्… शिकारीचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

खरंतर व्हिडिओत दाखवलेले हे दृष्य पूर्णपणे खरे नसून लोकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तरुणाने केलेला हा एक स्टंट आहे. वर आपले लग्न सोडून सामानाची डिलिव्हरी करायला गेला तर यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी तरुणाने हा स्टंट करु पाहिला होता. पांढऱ्या रंगाची शेरवानी, डोक्यावर पगडी आणि गळ्यात कंठी घालून फुल वराच्या वेशात तरुण डिलिव्हरी करायला रस्त्यावर उतरतो. त्याच्या पाठीवर स्वीगीची बॅग असते ज्यावरुन तो जेवणाची डिलिव्हरी करायला निघाल्याचे समजते. वराचा पोशाख आणि पाठीमागे स्वीगीची बॅग घेऊन जेव्हा तरुण पेट्रोल पंपाजवळ जातो तेव्हा ते दृष्य पाहून आजूबाजूची अनेक लोक थक्क होतात. एक वर आपले लग्न सोडून जेवणाची डिलिव्हरी करायला जात आहे या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसत नाही. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असला तरी लोकांच्या प्रतिक्रियांनी मात्र व्हिडिओची मजा द्विगुणित केली. सोशल मिडियावर व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये असून ५ लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक्स देत यावर आपली पसंती दर्शवली आहे.

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

हा व्हिडिओ @aakash_dixit_01 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “फक्त पांढरे शूज घालायचे बाकी होते मग वधू समोरुन निश्चित आली असती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जवेण ऑर्डर केलं होतं की वरं?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लग्नात जेवण कमी पडलं वाटतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Groom in sherwani swiggy delivery boy prank video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
1

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.