(फोटो सौजन्य: Instagram)
आपल्यासोबत काय घडलं आहे याची जाणीव नसताना मुलगी आजूबाजूंच्या लोकांना बघत निरागसपणे हसू लागते. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करत असून व्हिडिओतील मुलीला पाहून अनेकांनी तिच्या परिस्थितीवर आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जन्मत:च तिला सोडून देण्यात आलं हे किती मोठं दुर्दैव आहे अशा प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Unique Wedding: अजब लग्नाची गजब गोष्ट, दोन जोडप्यांनी वेधलं देशाचे लक्ष, जाणून घ्या संपूर्ण गोष्टचं
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडून आला आहे. व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या कापडात नवजात मुल एका घराच्या दरवाजाबाहेर फर्शीवर पडलेली दिसते. मुलगी झापेत नसते तर पूर्ण शुद्धीत ती आजूबाजूचे दृष्य पाहत असते. मुलीच्या आजूबाजूला काही लोक जमलेली दिसतात. यातीलच एक व्यक्ती घटनेचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद करुन सोशल मिडियावर शेअर करतो.
इंटरनेटवर दावा केला जात आहे की, मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला सोडून दिले. व्हिडिओमध्ये जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या मुलीला पाहून अनेकांना तिच्या परिस्थितीसाठी वाईट वाटले. या काही सेकंदाच्या क्लिपमध्ये मुलगी आजूबाजूच्या लोकांना पाहून निखळपणे हसतानाही दिसते. तिचे हे निरागस हसू अनेकांच्या मनाला भिडते आणि लोक व्हिडिओवर भावूक प्रतिक्रिया व्यक्त करु लागतात. तथापि, या व्हिडिओतील दाव्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
Viral Video: काजू कतली खरेदी करणं पडलं महाग! पुढे जे समोर आलं, ते पाहून ग्राहक हादरला
हा व्हिडिओ @flix.indian नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खूपच दुःखद. लोक असं कसं करू शकतात?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खरोखरच या चिमुकलीला दत्तक घ्यायचे आहे. कृपया कोणीतरी मला यासंदर्भातील जबाबदार व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊ शकेल का? मला या बाळाला दत्तक घ्यायचे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कोणती आई असं करू शकते? हे पाहून हृदय हेलावून जातं. आपल्या हृदयाचा एक तुकडा कुठेतरी दूर आहे, याची त्यांना जाणीव होत नसेल का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






