आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच दिवाळं निघालेल्या पाकिस्तानामध्ये नोटा छापण्यात घोड चूक आढळून आली आहे. नोटा फक्त एकाच बाजूने छापल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ यांनी छापलेल्या चूकीच्या नोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची अर्थिक परिस्थिती जगजाहीर आहे. धान्य आणि अन्नासाठी मोठ्या रांगा लावल्या जात आहेत. पैशाची कमी असताना पाकिस्तानामध्ये फक्त एकाच बाजूने छापलेल्या नोटा समोर आल्या आहेत. ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ने जारी केलेल्या काही नोटा एकाच बाजूने छापलेल्या असून दुसऱ्या बाजूने कोऱ्या आहेत. या सदोष नोटा लोकांच्या हातात आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा परत करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. या अर्धवट नोटाचा व्हिडिओ बँकेतील एका कर्मचाऱ्यानेच तयार केला आहे.
The Pakistan State Bank accidentally printed currency notes only on one side. pic.twitter.com/o74KvM07Fq
— Economy of Pakistan (@Pakistanomy) March 12, 2024
पाकिस्तानी वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, सोशल मीडियावर नोटांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ने या नोटांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती हा स्वत:ला नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानच्या मॉडेल कॉलनीचा शाखा व्यवस्थापक असल्याचे सांगतो. यात तो एकाच बाजूने छापलेली एक हजार रुपयाची नोट दाखवतो. विशेष म्हणजे ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बॅक कर्मचाऱ्यांना अर्धवट नोटांची माहिती कळाली.