रस्त्याच्या मधोमध रील बनवत होता; पब्लिकला राग आल्याने फेकून दिली स्कूटर
सध्या सोशल मीडियाच्या दुनियेत फेमस होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. लोक इतके विचित्र कटेंट तयार करतात की ते पाहून आश्चर्य वाटते. स्टंट करणाऱ्यांचे तर व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषत: तरूण मुले मोठ्या प्रमाणावर स्टंटचे व्हिडीओ बनवतात. पण कित्येकदा यामुळे त्याचा जीव धोक्यात येतो. तरीही लोक दररोज एक धोकादायक स्टंट पोस्ट करत असतात आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी पोस्ट करत असतात.
या स्टंटबाजांवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली तरी लोक त्यांच्या कृत्यापासून परावृत्त होत नाहीत. फेमस होण्याचे भूत त्याच्या मनाला असे सतावते की त्याला याशिवाय दुसरे काम नाही. असाच एक स्टंट करणाऱ्या मुलाला कर्नाटकच्या जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. लोकांना धडा शिकवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये सार्वजनिक स्टंट करणाऱ्या मुलाची स्कूटर उचलून उड्डाणपुलावरून खाली फेकण्यात आली.
नेमके काय घडले?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरूण टुमकुर महामार्गावर स्कूटरवर स्टंट करत रील बनवत होता. पण फ्लायओव्हरवर वाहनांची भरपूर गर्दी हाती. लोकांना बराच वेळ थांबावे लागत होते. यामुळे तेथील लोक स्टंट करणाऱ्या मुलावर चिडले होते. अचानक लोकांनी स्टंट बॉयला कडक इशारा देत त्याची स्कूटर उचलून उड्डाणपुलाखाली फेकून दिली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुलाच्या वर मोठा जमाव जमला असून, ते स्कूटर उचलून फ्लायओव्हरखाली फेकताना दिसत आहेत. उड्डाणपुलाच्या खाली उभे असलेले लोक शांतपणे उभे राहून त्यांना पाहत आहेत. त्या स्कूटरचे तुकडे झालेले व्हिडीओत दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ
A young man was seen performing reckless scooter stunts on Tumakuru National Highway for social media reels. Angry onlookers threw his scooter off a flyover as a stern warning.#BikeStunt #Bengaluru #Reels pic.twitter.com/4yyQX8aK3X
— The Munsif Daily (@munsifdigital) August 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @munsifdigital नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘लोकांनी हे चांगले केले नाही.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘हे रीलवाले त्यांचे तसेच इतर लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना धडा शिकवला नाही तर मोठा धोका होऊ शकतो.’ आणखी एकाने लिहिले की, ‘शाब्बास, रील बनवणाऱ्यांना असा धडा शिकवला पाहिजे, तरच ते पुन्हा शहाणे होतील.’