
man makes handmade kurti for wall lizard
या तरुणाने माणसांसाठी नव्हे, तर चक्क पालीसाठी कपडे शिवले आहे. त्याने पालीला ते कपडे घातले असून पाल भिंतीवर लाला रंगाच्या कपड्यात फिरताना दिसत आहे. या तरुणाने पालीसाठी लाल रंगाची छोटी कुर्ती तयार केली आहे. तसेच आणखी पिवळ्या रंगाची कुर्ती देखील तयार केली आहे. आतापर्यंत तुम्ही कुत्रा आणि मांजरीला कपडे घालतलेले पाहिले असेल. पण आता या तरुणाने पालीसाठी देखील कपडे तयार केले आहेत. याची किंमत २० रुपये आहे. ही पहिलीच पाल असेल जी कपडे घालून भिंतीवर फिरत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर हास्याचा कल्लोळ सुरु आहे. तसेच भारतातील माणसाने ही कुर्ती तयार केली आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @trolls.circuit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, दुपट्टा आणि सलवार कुठे आहे तिची?, तर दुसऱ्या एकाने आयुष्यात हेच बघायचं राहिले होते असे म्हटले आहे. आणखी काहींनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. आता सगळ्या मुली पालीला कुर्ती कुठून घेतली विचारणार असे एकाने म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.