
coffee seller viral video
सहसा एखादा बिझनेझ सुरु करायला तुम्हाला पहिल्यांदा त्यासाठी जागा, स्टॉल, किंवा एखाद्या दुकानाची गरज पडते. तसेच वेगवेगळे कागपत्रे, अधिकृत परावान्याचीही गरज पडते. परंतु एका तरुणाने या सर्वांचे झंझट नको म्हणून एक भन्नाट अशी आयडिया केली आहे. त्याने कॉफी शॉफ आपल्या अंगावरच सुरु केले आहे. यामुळे या तरुणाला ना कोणत्या जागेची, ना भाडे देण्याची चिंता आहे. सध्या या तरुणाचा खाद्यांवर कॉपीचे शॉप घेऊन विक्री करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तरुणाच्या या छोट्याशा भन्नाट स्टार्टअपचे कौतुक केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणाने त्याच्या शरीरावर एक सेटअप केला आहे. त्याच्या खांद्यावर एका एका जॅकेटसारख्या सेटअपमध्ये कॉफी, गरम पाणी, खॉफी पावडर, दूध, साखर आणि कॉफी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्या घेतले आहे. तरुण लोकांना गरम गरम कॉफी बनवून देत आहे. चालता फिरता तरुण लोकांना कॉफी बनवून देत आहे. यामध्ये डिस्पोझिबल कपचीही व्यवस्था तरुणाने केली आहे. या सेटपमध्ये सर्व कॉफी बनवण्याचे साहित्य असून तरुण कॉफी बनवून त्यावर चॉकलेट सिरपने डिझाउन बनवून देत आहे. त्याचा ही आयाडिया पाहून लोक थक्क झाले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sourceofkhaddo या अकाउंटवर पाहायाला मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने वा! काय भन्नाट आयडिया आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने कसा केला हा जुगाड असे विचारले आहे. तर तिसऱ्या एकाने अशी बॅग कुठे मिळाली असा प्रश्न केला आहे. अनेकांनी तरुणाच्या या आयडियाचे कौतुक केले आहे. त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.