
विराट कोहलीसारखा दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? पाहून स्वतः किंग कोहली झाला अवाक्; युजर्स म्हणाले, "बस 19-20..."; Video Viral
रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाची तयारी सुरू असताना वडोदरामध्ये प्रचंड उत्साह होता. सामन्यापूर्वी कोहलीने काही मुलांना आपला ऑटोग्रॉफ दिले. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले पण लक्षवेधी ठरला तो बालपणीच्या विराट कोहलीसारखा दिसणारा मुलगा… किंग कोहलीसोबतच्या या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये कोहली आणि त्या तरुण चाहत्यामधील आश्चर्यकारक साम्य अधोरेखित झाले आहे. वडोदरामध्ये जमलेल्या तरुण चाहत्यांना स्वाक्षरी देताना कोहलीच्या गालावर मोठं स्मितहास्य आलं ज्याने त्यालाही मुलगा आणि त्याच्यामधील साम्य कदाचित लक्षात आलं असावं असं जाणवतं.
This kid literally looks like childhood Kohli 😭 https://t.co/pmrz0zorQx pic.twitter.com/kND7vpU4on — Dive (@crickohlic) January 9, 2026
Virat Kohli smiled after seeing his childhood look-alike kid ❤️ pic.twitter.com/QHMh1cDuBU — Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) January 9, 2026
दरम्यान विराट कोहलीची त्याच्या छोट्या फॅनसोबत झालेली ही भेट आणि त्यांच्यातील साम्य दर्शवणारे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. युजर्स हे दृश्य पाहून थबकले तर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “खरोखर सारखेच दिसत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चिकू टाईम ट्रॅव्हल करून स्वतःचाच ऑटोग्राफ घ्यायला आला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो इतका सारखा दिसतोय की यात तर 19-20 चा फरकही जाणवत नाहीये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.