
NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले... Video Viral
काय आहे प्रकरण?
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एका रस्त्यावरचे दृष्य दिसून येते. यात दिसते की, चालू रस्त्यावर एक थार कार NH-48 च्या साइनबोर्डवर आदळून चिपकलेली आहे. साइनबोर्ड दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूरला जाण्यासाठी दिशानिर्देश दर्शवितो. हे संपूर्ण दृष्य एका चित्रपटाच्या दृष्याप्रमाणे वाटते पण खऱ्या आयुष्यात असे घडून येणे जरा अशक्य दिसत आहे ज्यामुळे अनेकांनी व्हिडिओला एआय निर्मित असल्याचे म्हटले आहे. या कथित घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कोणत्याही मोठ्या वर्तमानपत्रांनी किंवा माध्यमांनी त्याचा उल्लेख केलेला नाही. यावरून असे सूचित होते की हा व्हिडिओ मनोरंजनासाठी किंवा व्हायरल प्रँकसाठी तयार केला गेला असावा. अशा परिस्थितीत, पडताळणीशिवाय कोणताही व्हिडिओ खरा आहे असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @MeenaRamesh91 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना याच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आले आहे की, ‘हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक थार वाहन थेट एका बिलबोर्डवर आदळताना दिसत आहे. व्हिडिओ पाहता, तो राष्ट्रीय महामार्ग ४८ वर असल्याचे दिसते, जो दिल्ली, गुडगाव आणि जयपूरकडे जात आहे. आजकाल, आपण थार वाहन चालकांकडून असे कारनामे पाहत आहोत…कदाचित हे थार वाहन जयपूरकडे जात होते, परंतु ते थेट जयपूरला गेले. मी व्हायरल व्हिडिओची पुष्टी करू शकत नाही.व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर, मला सांगा, हे शक्य आहे का?’.
यह वीडियो वायरल हो रहा है जिसमें एक थार गाड़ी है जो सीधे बोर्ड में घुसी हुई दिख रही है..! वीडियो में देखकर लग रहा है यह NH 48 है जो दिल्ली गुड़गांव और जयपुर की तरफ जा रहा है..! आजकल थार गाड़ी वालों के कारनामे ऐसे ही देखने को मिल रहे हैं…! शायद ये थार गाड़ी जयपुर की तरफ जा… pic.twitter.com/G3bDZQYIRz — Ramesh Meena (@MeenaRamesh91) February 18, 2026
आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral
अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “व्हिडिओमध्ये, थार वाहन बोर्डला धडकताना दिसत आहे, परंतु व्हायरल क्लिपची पुष्टी करणे आवश्यक आहे, कधीकधी कोन, संपादन किंवा अपघात हे कारण असू शकते, पुराव्याशिवाय निष्कर्ष बरोबर नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “गुंडगिरी करण्यास उत्सुक असलेल्या गुन्हेगारांकडून थार वाहनांना अनेकदा प्राधान्य दिले जाते’ आणखीन एका युजरने लिहिले आहे की, “हे थार वाहन इतक्या उंचीवर कसे पोहोचू शकते? ते खरे आहे की बनावट हे मला माहित नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.