मगरीच्या हातून शिकार होणार तितक्यात देवदूत बनून आला पाणघोड्यांचा ग्रुप; पाण्यातील थरार युद्ध पाहून डोळेच विस्फारतील... Video Viral
जंगलाचा नियम आहे इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मृत्यू होणे हे अटळ सत्य आहे. जंगलातील मोठे आणि शूरवीर प्राणी लहान, कमजोर प्राण्यांना आपली शिकार बनवतात आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आता जंगलातील शिकारी म्हटले की यात वाघ-सिंहासह मगरीचाही प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या चपळतेने मगर जंगलातीलच काय हवेत उडणाऱ्या पक्ष्यांनाही आपली शिकार बनवते. अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात मगरीने प्राण्याला आपली शिकार बनवल्याचे दिसून येते. मगरीने अक्षरशः आपल्या तोंडात त्याचे मुख ठेवलेले असते आणि मगर त्याला फस्त करणार तितक्यात तिथे पाणघोड्यांच्या ग्रुपची एंट्री होते आणि क्षणातच सर्व चित्र पालटते. यांनतरचे दृश्य आणखीनच रोमांचक असून निसर्गाचा नियमही कसा क्षणात बदलू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला यातून पाहायला मिळेल.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नदीकाठावर एका मगरीने एका जंगली प्राण्याला त्याच्या जबड्यात पकडल्याचे दिसून येते. प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो मात्र मगर काय त्याला सोडण्याचा विचारात नसतो. हरणाला मगरीच्या जबड्यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य वाटत असते आणि तितक्यातच एका पाणघोड्यांचा ग्रुपची धमाकेदार एंट्री होते. एक पाणघोडा मगरी आणि शिकार होत असलेल्या प्राण्याकडे वेगाने जातो आणि त्याच्या प्रचंड शरीराचा आणि शक्तीचा वापर करून मगरीला घाबरवतो. प्राणीही या संधीचा फायदा घेत मगरीच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून तिथून पळ काढतो आणि आपला जीव वाचवतो. पाण्याच्या राक्षसाला पाणघोड्यांनी दिलेली ही मात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
Hippos save wildebeest from crocodiles pic.twitter.com/cR9FPRZ31V
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 18, 2025
Viral Photo: कॉलेजमध्ये सापडला विचित्र सांगाडा, माणसाचे हात तर शरीर जनावराचे; पाहून डोळे विस्फारतील
पाण्यातील हा थरार @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7.3 मिलियन व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, त्या प्राण्याचा पाय तुटल्यामुळे तो एका जलद मृत्युऐवजी आता हळूहळू मृत्यू पावेल.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाणघोड्यांनी प्राण्याला वाचवले नाही तर त्यांना फक्त मगरीला धडा शिकवायचा होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, पाणघोडे हे जंगलाचे रक्षणकर्ते आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.