पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भयानक Photo Viral; जिकडे तिकडे मृतांचा सडा अन् काय आहे मूळ सत्य?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममधील बैसरन व्हॅली भागात दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करून बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात 26 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण जग हादरला असून याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर होत असून यात अनेक दावे देखील करण्यात येत आहेत. असाच एक दावा करणारा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, जो पहलगाम हल्ल्याचा असल्याचे सांगण्यात आले आहे. यात जागजागी मृतांचा खच पडल्याचे दिसत आहे. पण खरंच हे फोटो पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आहेत का हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. एका वृत्तवाहिनीकडून याचा खुलासा करण्यात आला आहे.
अनेकांनी आता हे फोटो रीशेअर देखील केले आहेत. संशयास्पद फोटोंवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपासण्याची प्रक्रिया करण्यात आली. या फोटोंपैकी एकही फोटो कोणत्याही प्रमुख मीडिया संस्थेने किंवा अधिकृत वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेला ननसल्याचे आढळून आले. त्यामुळे या फोटोंची खरी सत्यता जाणून घेण्यासाठी पुढचा टप्पा म्हणून AI इमेज डिटेक्टरच्या सहाय्याने अधिक सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. फोटोंमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची गंभीरता आणि संवेदनशीलता लक्षात घेता, ते वास्तवातले आहेत की कृत्रिमरीत्या बनवलेले आहेत, याचा शोध घेणे आवश्यक वाटले. या फोटोंमागचं खरं सत्य जाणून घेणं हा या तपासणीचा मुख्य उद्देश होता.
These images of Hindu massacare will haunt the Nation for generations 🙏😢
(7 October 💔)#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/mxA6nLzdOI— 💫 Avni Pandit (AA𓃵) (@Avni_Pandit1) April 23, 2025
These images of Hindu massacare will haunt the Nation for generations 🙏😢#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/7DVgqLJXcG
— K Nayak 🚩 🇮🇳 (@kairav_I) April 23, 2025
आम्ही संशयास्पद फोटोंवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपासण्याची प्रक्रिया सुरू केली. या फोटोंपैकी एकही फोटो कोणत्याही प्रमुख मीडिया संस्थेने किंवा अधिकृत वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेला नव्हता, हे आम्हाला आढळून आले. त्यामुळे या फोटोंची खरी सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पुढचा टप्पा म्हणून AI इमेज डिटेक्टरच्या सहाय्याने अधिक सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. फोटोंमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची गंभीरता आणि संवेदनशीलता लक्षात घेता, ते वास्तवातले आहेत की कृत्रिमरीत्या बनवलेले आहेत, याचा शोध घेणे आवश्यक वाटले. या तपासणीतून फोटोंमागचं खऱं सत्य समजून घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
आणखी एक AI डिटेक्टर, https://wasitai.com/ ने आणि साईट इंजिनने देखील असा निष्कर्ष काढला की, हे फोटो AI-जनरेटेड आहेत.
काय आहे सत्य?
सखोल अभ्यासातून असे दिसून आले की, व्हायरल होत असलेले हे फोटो काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नसून यात केलेला दावा देखील खोटा आहे. हे फोटो पूर्णपणे एआय जनरेटेड आहेत. व्हायरल झालेले फोटो खोटे आणि बनावटी असल्याचे रिसर्चमध्ये आढळून आले आहे.