(फोटो सौजन्य – Instagr
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओ दररोज शेअर केले जातात. इथे काही अशा घटनाही शेअर होतात ज्यांना पाहून आपल्याला हसू येईल तर काही घटना शेअर केल्या जातात ज्यांना पाहताच आपल्या पायाखालची जमीन सरकेल. आताही इथे असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांना हादरवून सोडलं. विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करू नये म्हणून शाळेकडून अनेक नवनवीन उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना काही अंतरावर बसवले जाते, त्यांची कंपास चेक केली जाते मात्र आता जो व्हिडिओ समोर आला आहे त्यातील दृश्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी बसून परीक्षा देताना दिसत आहेत मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हे विद्यार्थी कोणत्याही वर्गात बसलेले नाहीत. व्हिडिओमध्ये दिसतंय की सर्व मुले शाळेबाहेर भरउन्हात वाळूवर बसून पेपर लिहीत आहेत.यावेळी प्रत्येकाला इतक्या अंतरावर बसवलेले असते की इच्छा असूनही त्यांना कुणाला उत्तर विचारता येणार नाही. शाळेची ही कल्पना विद्यार्थ्यांसाठी कोणत्या शिक्षेतून कमी नाही.
ज्या उष्णतेत आपल्याला साधं उभं राहता येत नाही त्यात शाळेने विद्यार्थ्यांना पेपर लिहण्यासाठी बसवलं आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अशी सेटिंग अरेंजमेंट केली असली तरी यात विद्यार्थ्यांचे आरोग्य मात्र पणाला लागले आहे. आजूबाजूचे दृश्य पाहता हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे दिसते. व्हिडिओ शेअर करताना, तो कधी बनवला गेला याचा उल्लेख नाही पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. लोक यातील दृश्यांनी अचंबित झाले असून लोक आता त्याला पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @theindiansarcasm नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ही कोणत्या प्रकारची पद्धत आहे?’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही कोणती परीक्षा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या उष्णतेमध्ये मेंदू कसं काम करणार?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.