शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा.... पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
सोशल मीडियाच्या दुनियेत डोळ्यांसमोर कधी काय पाहायला मिळेल ते काय सांगता येत नाही. इथे अनेक अजब-गजब आणि थक्क करून टाकणारे व्हिडिओज शेअर होत असतात आणि आताही इथे असेच काहीसे घडून आले आहे. सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो काही साधा सुधा व्हिडिओ नसून यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. आपण प्रत्यक्षात एका विषारी सापाला पाहूनच आपली हवा टाईट होते पण आताच्या व्हिडिओमध्ये तर एक नाही दोन नाही ते एका शेतात शेकडो सापांचा सडा आढळून आला आहे. एकाच ठिकाणी इतके साप आणि सापांनी भरलेले हे शेत पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले असून इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सर्वांचाच थरकाप उडवत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक शेतातील दृश्य दिसून येत आहे. हे दृश्य इतके हैराण करणारे आहे की त्याने कुणाचेही हातपाय थरथर कापू शकतात. व्हिडिओमध्ये दिसतंय की शेकडो आणि हजारो साप शेतात इकडे तिकडे रेंगाळत आहेत, जणू काही साप पिकं नाही तर शेती करत आहेत. साप जेसीबी मशीनवरही चढले आहेत आणि पुढे जाताना त्याला चिकटून आहेत. काही साप मशीनच्या बोनेटवर पोहोचले आहेत आणि केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृश्य इतके भयानक आहे की ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जेसीबी चालवत आहे आणि सापांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सापांची संख्या इतकी जास्त आहे की काम कठीण होते. लोक विचार करत आहेत की हे खरे आहे की एआयचा चमत्कार आहे, कारण इतके साप एकत्र पाहणे आश्चर्यकारक आहे. काहींचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ एडिट केला गेला असावा. व्हिडिओ नक्की खरा आहे की खोटा हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
हा व्हायरल व्हिडिओ @mgtc_farming नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “Al व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे काय आहे, इतके साप आले कुठून?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं असू शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.