(फोटो सौजन्य: Instagram)
सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. त्याचे शौर्य आणि सामर्थ्य इतके अफाट आणि जबरदस्त आहे की त्याच्यासमोर मोठमोठे प्राणीही शिकस्त होतात. सिंहाची एक डरकाळी संपूर्ण जंगलाला हादरवण्यासाठी पुरेशी असते आणि अशातच जर त्याला आणखीन एका मित्राची साथ मिळाली तर ते डेडली कॉम्बिनेशन बनतं. सध्या सोशल मीडियावर सिंहाचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला आहे ज्यात तो आपल्या दुसऱ्या मित्रासोबत जंगलातील बिबट्यांची शिकार करताना दिसून आला आहे. दोघेही एकजुटीने बिबट्यांचा अशा फडशा पाडतात की पाहून सर्वच हादरून जातात. शिकारीचे हे दृश्य आणि ही सामर्थ्यवान मैत्री आता सर्वांनाच थक्क करत असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक सिंह बिबट्याचा पाठलाग करत त्याला जमीनदोस्त करताना दिसून येतो. सिंह क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा जबडा फाडून त्याचा फडशा पाडू लागतो आणि तितक्यातच मागून त्याचा मित्र एक दुसऱ्या सिंह त्याच्या मदतीसाठी धावतच तिथे पोहचतो. दुसरा सिंहही येता क्षणीच बिबट्याचे लचके फोडत, दोन्ही सिंह त्याची मजा लुटू लागतात. दुरूनच बिबट्याचे दुसरे साथीदार हे सर्व दृश्य घाबरत घाबरत पाहत असल्याचे दिसून येते. व्हिडिओत पुढे दोन्ही सिंह मिळून इतर बिबट्यांचीही कशी शिकार करतात याचे एक थरारक दृश्य दिसून येते. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण मित्रासोबत सिंहाने केलेल्या या अनोख्या शिकारीचा व्हिडिओ आता चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. मैत्रीने आपण संपूर्ण जगावर राज्य करू शकतो ही गोष्ट या व्हिडिओतून खऱ्या अर्थाने नजरेस पडते.
हा व्हायरल व्हिडिओ @panaharahman नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काही कारणामुळेच तो जंगलाचा राजा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा चित्ता प्रत्यक्षात जखमी झाला होता म्हणून तो धावू शकला नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिंहांच्या एकतेने सर्व चित्रच पलटवून लावले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.